Agnipath Yojana Information In Marathi (Agneepath Yojna 2022):- अग्निपथ योजना माहिती :- परिवर्तनात्मक सुधारणा करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेला 14 जून रोजी मंजुरी दिली आहे.
सेवा कायद्यांतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी भरती केली जाईल.चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना एक वेळचे ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाईल.यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती होणार आहे.
अग्निपथ योजनेची सुरुवात आपल्या देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 17.5 ते 21 वर्षाच्या नागरिकांना 4 वर्षासाठी भारतीय सेना मध्ये भरती केले जाणार आहे.
भारतीय तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी दाखल होता यावे यासाठी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेला 14 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत निवडलेले युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील व्हायची परवानगी या योजनेनुसार मिळणार आहे.सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे.
सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजनेद्वारे संधी मिळेल. सशस्त्र दलांतील तरुणांच्या संख्येत वाढ होऊन या दलांमध्ये नव्याने ‘जोश’ आणि ‘जज्बा’ तयार होईल त्याच वेळी अधिक तंत्रज्ञान जाणणाऱ्या युवकांच्या भरतीमुळे सशस्त्र दलांत काळानुरूप परिवर्तनशील बदल घडेल.
अग्निवीरांना कोणता लाभ मिळेल ?
अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि खडतर मेहनत (hardship) भत्त्यांसह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे ‘सेवानिधी’ पॅकेज दिले जाईल ज्यामध्ये त्यांचे योगदान त्यावरील जमा व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेइतके सरकारचे योगदान असेल ज्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे व्याज समाविष्ट असेल : –
समाजाच्या आर्थिकदृष्ट्या वंचित स्तरातील तरुणांवर आर्थिक दबाव असतो. अशा वंचित अग्निवीराला आर्थिक दबावाशिवाय (त्याच्या/तिच्या) भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास अंदाजे रु. 11.71 लाखांचा सेवा निधी मदत करेल.
नियमित केडर म्हणून सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निवडलेल्या व्यक्तींना पुढील किमान 15 वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देणे आवश्यक आहे आणि ते भारतीय सैन्यातील कनिष्ठ आयोग अधिकारी/इतर पदांच्या विद्यमान अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील.
अग्निपथ योजनेच्या अटी व शर्ती –
अग्निपथ योजनेंतर्गत, अग्निवीरांची चार वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित सेवा कायद्यांतर्गत नोंदणी केली जाईल.
अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या 25% पर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल. तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्रपणे जारी केली जातील. ही निवड करणे हे सशस्त्र दलांचे विशेष अधिकारक्षेत्र असेल.
तीनही सेवांसाठी ऑनलाइन केंद्रीकृत प्रणालीद्वारे विशेष रॅलीजसह आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य पात्रता संस्था अशा मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांच्या कॅम्पस मुलाखतींद्वारे नावनोंदणी केली जाईल. ‘ऑल इंडिया ऑल क्लास’ आधारावर नावनोंदणी केली जाईल आणि पात्रतेसाठी वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निर्धारित केलेल्या वैद्यकीय पात्रता अटींची पूर्तता अग्निवीरांना करायला लागेल. संबंधित श्रेणींसाठी वेगवेगळ्या अटी लागू होतील. अग्निवीरांची शैक्षणिक पात्रता विविध श्रेणींमध्ये नावनोंदणीसाठी प्रचलित राहील.
उदाहरण : जनरल ड्युटी (GD) शिपाई मध्ये प्रवेशासाठी, शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 उत्तीर्ण आहे).
अग्निपथ भरतीसाठी वयाची अट –
किमान 17.5 वर्षे व कमाल 21 वर्ष
अधिक माहितीसाठी खालील लिंक बघू शकता : येथे बघा