Samvidhan Din Wishes in Marathi | भारतीय संविधान दिवसाच्या शुभेच्छा

Samvidhan Din Wishes in Marathi, Constitution Day Wishes in Marathi भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Samvidhan Diwas) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस (National Law Day) म्हणून देखील ओळखला जातो. मग आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेत लोकशाहीला बळकटी देणार्‍या संविधानाला चिरायू ठेवण्यासाठी तुमच्या मित्रपरिवार मध्ये सोशल मीडीयाच्या माध्यमातून भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्च्छा शेअर करू शकता

Samvidhan Din Wishes in Marathi

समस्त भारतीय बांधवाना संविधान दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

खूप भाषा, शेकडो विधी आणि हजार विधान आहेत
या सर्वाना जोडून ठेवणार आपलं संविधान आहे
संविधान दिनाच्या शुभेच्छा

संविधान कितीही वाईट असुदे
ते चांगले सिद्ध होऊ शकते
जर त्याचे पालन करणारे लोक
चांगले असतील
संविधान दिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा
आज सजला!
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना
ज्यांनी भारत देश घडविला!!
संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणी तर सर्वांच्या हातात होती ताकत तर सर्वांच्या मनगटात होती पण राज्यघटना लिहण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा

ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो…. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.

भिमाच नाव घेतल्याशिवाय हातबार नाही आणि भिमाच्या संविधानाशिवाय हा देश चालणार नाही ,भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..

जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे , जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे .भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही दिले संविधान भारतीयांना, तोडल्या बेड्या जाती धर्माच्या, दिला धम्म संविधानाचा..! आधुनिक भारताचे जनक, भारतीय . संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर , संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील सर्वश्रेष्ठ संविधान…!हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका करणा-या संविधानाचे रक्षण करू या…! संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान मसुदा समितीने घटनेचे प्रारुप घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सोपवले. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close