Karva Chauth Information In Marathi | करवा चौथ व्रत

Karva Chauth Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत करवा चौथ व्रत काय आहे आणि कश्या पद्धतीने मानवीला जातो या बद्दल, मित्रानो हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात.

karva-chauth-information-in-marathi

Karva Chauth Information In Marathi


करवा चौथ हिंदू धर्मीय महिलांचा सर्वात महत्वाचा व्रत मानले जाते पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसहित जवळपास संपूर्ण भारतात हे व्रत उत्साहाने केले जाते.

महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात व दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून आपल्या पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडतात.

या वर्षी करावा चौथ रविवारी २४ ऑक्टोबर या दिवशी हे व्रत आहे, फार कमी लोकना या व्रत बदल माहित आहे, या दिवशी एक पत्नी आपल्या पती साठी केवळ चौथ देवीकडे सौभाग्याचे वरदान मागत नाहीत, तर या व्रत मध्ये संपूर्ण सृष्टीला समाविष्ट केले जाते, ही सृष्टी पाच तत्त्वापासून बनलेली आहे, यामध्ये अग्नी, जल, वायू ,पृथ्वीआणि आकाश हे तत्त्व आहेत. हे पाचही तत्त्व साक्षी मानून हे पूजा केली जाते.

तर चला जाणून घेऊया या पाच तत्त्वाना साक्षी मानून पूजा कशी करतात.

करवा : म्हणजेच मातीचा करवा या मध्ये एक (मातीचे कलशाप्रमाणे भांडे) असते हे पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक आहे आणि या व्रतामध्ये महिला सकाळी करवामध्ये म्हणजेच त्या मातीच्या भाड्या मध्ये पूजेसाठी पाणी भरले जाते आणि त्या भांड्यातील पाण्याने पत्नी चंद्राच्या पूजेनंतर पतीसोबत पाणी पिते. याच करव्याला व्रताचा पहिला साक्षी म्हणजे पृथ्वी तत्त्व मानले गेले आहे.

जल: करवामध्ये म्हणजे एका मातीचे भांड्यामधे पाणी ठेवले जाते , जल तत्त्वाचे प्रतीक आहे. करवा चौथ पूजेमध्ये सौभाग्यवतीच्या व्रताचा दुसरा साक्षी पाणी आहे. हेच पाणी पिऊन व्रत सोडले जाते.

चंद्राची पूजा: महिला या व्रत मध्ये दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा करतात . चंद्र आकाशात विराजित आहे. चंद्राच्या माध्यमातून तिसरा साक्षी आकाशाला व्रतामध्ये समाविष्ट केले जाते. या कारणामुळेही चंद्राची पूजा केली जाते. हे आकाश तत्त्वाचे प्रतीक आहे.

दिवा – एक गोल आकाराची चाळणी घेऊन आणि त्यामधून चंद्र आणि पतीचे दर्शन घेताना चाळणीत दिवाही ठेवला जातो. हे अग्नी तत्त्वाचे प्रतीक आहे. या व्रताचा चौथा साक्षीदार अग्नी आहे.

वायू – या व्रताची पूजा हि घरा मध्ये करत नाही , एखाद्या खुल्या मैदानावर किंवा आपल्या घरच्या छतावर केली जाते. मोकळ्या हवेत. हे वातावरणच वायू मंडळाचे प्रतीक असते. जे या व्रताचा पाचवा साक्षी मानले गेले आहे.

अशाप्रकारे एक सौभाग्यवती महिला हा व्रत संपूर्ण सृष्टीला या व्रतामध्ये समाविष्ट करून व त्यांना साक्षी मानून पूजा करते या पंचतत्त्वाचा समावेश इतर कोणत्याही व्रतामध्ये दिसून येत नाही. यामुळे हे व्रत अत्यंत खास मानले गेले आहे.


FAQ’s

करवा चौथ म्हणजे काय?

हिंदू महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्या हेतू हे व्रत करतात

यास करवा चौथ व्रत का म्हणतात?

चौथ म्हणजेच चतुर्थी हा उत्सव हिंदू कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी वर साजरा केला जातो. विशेषतः महिलांचा सन म्हणून याची ओळख आहे.

करवा चौथ व्रत 2023 मध्ये केव्हा आहे ?

या वर्षी करावा चौथ 1 नवंबर या दिवशी हे व्रत आहे

करवा चौथ ची पूजा कशा पद्धतीने केली जाते ?

महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात व दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून आपल्या पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडतात.
या दिवशी एक पत्नी आपल्या पती साठी केवळ चौथ देवीकडे सौभाग्याचे वरदान मागत नाहीत, तर या व्रत मध्ये संपूर्ण सृष्टीला समाविष्ट केले जाते, ही सृष्टी पाच तत्त्वापासून बनलेली आहे, यामध्ये अग्नी, जल, वायू ,पृथ्वीआणि आकाश हे तत्त्व आहेत. हे पाचही तत्त्व साक्षी मानून हे पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi

नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती | Navratri Information In Marathi

हे पण वाचा

close