नागपंचमी मराठी निबंध | Nagpanchami Marathi Nibandh

नागपंचमी भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यापैकी एक सण नागपंचमी , हा सण श्रावण महिना सुरु झाला कि अनेक सण सुरु होतात म्हणून श्रावण महिन्याला सणाचा महिना असेही जाते, नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण आहे

श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजेच श्रावण महिन्याचा पाचव्या दिवशी हा सण असतो,या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.

या दिवशी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची प्रथा आहे, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी. तेव्हापासून नागपंचमी ची प्रथा सुरु झाली असे मानले जाते,

नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.

नागपंचमीच्या दिवशी महिला घराची स्वछता करतात, जमिनी शेणाने सारवतात. अंगणात रांगोळी काढतात, या दिवशी सर्व स्त्रिया नागाच्या मातीची मूर्ती पाटावर ठेवून त्याची पूजा करतात. दूध, लाह्या , आघाडा वाहून नागदेवतेची पूजा केली जाते.

काही भागात नागदेवतेचच्या फोटोची पूजा केली जाते. नागदेवतेच्या फोटोला लाह्यांची माळ घालतात. दूध आणि लाह्यांचा नैवैद्य दाखवतात.

या दिवशी गव्हाची खीर , चण्याची डाळ , गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते , पुरणपोळीचा बेत केला जातो. या दिवशी स्त्रिया व मुली फेर घरून नागपंचमीची गाणी म्हणतात. फुगड्या खेळतात.

झाडांना झोके बांधून झोके घेतात, काही ठिकाणी स्त्रिया नागाच्या वारुळाची पूजा करतात , वारुळापाशी गाणी म्हणून हा सण साजरा करतात.

एका कथेनुसार पाच युगापूर्ण सत्येश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती, सत्येश्वर हा तिचा भाऊ होता, सत्येश्वर मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.

सत्येश्वरी ला तिचा भाऊ नागरूपात दिसला, भावाच्या शोकात तिने अन्न ग्रहण केले नाही, त्यामुळे त्या दिवशी स्त्रियांनी भावाच्या नावाने उपवास करण्याची प्रथा सुरवात झाली , म्हणून या कथे अनुसार नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात , आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्याचे सर्व दुःख नष्ठ व्हावे हे उपवास करण्यामागचे कारण आहे.

नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधले जाते , कारण शेतातील उंदीर घुशी नाग खात असल्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही, या दिवशी अप्रत्यक्ष रित्या नागाला इजा पोहोचू नये म्हणून शेतकरी शेतात नगरात नाही अश्या पद्धतीने नागपंचमी हा सण सर्वत्र भारतात भक्ती भावाने साजरा केला जातो.

पर्यावरणातील सापाचे व नागाचे रक्षण करणे हाच या सणाचा मुख हेतू आहे , आजच्या काळात सापाचे प्रमाण कमी होतं आहे त्यामुळे सर्प मित्र अनेक माध्यमातून जनगागृतीचे काम करत आहे , आपल्याला सर्प दिसला तर सर्प मित्राच्या मदतीने त्याला झाडजूडपात किंवा अभयारण्यात सोडणे हि आपली जबाबदारी आहे.


You may also like...