Baby Shower Invitation Message in Marathi | डोहाळे जेवणाचे निमंत्रण

Baby Shower Invitation Message in Marathi:-

Baby Shower Invitation Message in Marathi

डोहाळे जेवण आमंत्रण

१० ते १२ भजनाचा कार्यक्रम / १२ ते २ स्नेह भोजन

शालु हिरवा , जरतारी काठ चंदनाचा पाठ , पक्वान्नांचे ताट
श्रीखंड खिरीला रंग केशराचे ।।सुगन्धित वाळा , उटी चंदनाची
हौस पुरवा फळांची फुलांची ।। कौसल्याचा राम , वकीचा शाम, असेल तयाचे रूप मनोरम
पळसाद कानी घुंगुर वाळयाचे ।। हवे नको काय ते तु सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।

पत्ता

आग्रहाचे निमंत्रण :-

“कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा घरी येणार येणार गं.
लाडक्या राणीला लागले डोहाळे
पुरवा सोहळे रामराय.
ओटी भरा गं ओटी भरा, हिची ओटी भरा.
वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते, शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला आनंदाच्या सरींनी भिजवीते.”

सस्नेह नमस्कार,

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात एका नवीन पाहुण्याची चाहूल लागली आहे. हे आनंदाचे गाठोडे आमच्या घरी आमच्या स्नुषेच्या पोटी देवाकडून येऊ घातले आहे. त्यानिमित्ताने आम्ही आमची स्नुषा सौ. ….. हिचे डोहाळे जेवण करण्याचे ठरविले आहे.आमच्या या आनंदात आपली शुभ उपस्थिती अपेक्षित आहे. तरी आपण आपल्या इष्ट मैत्रिणींसह दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी, संध्याकाळी 6 वाजता आमच्या घरी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि आग्रहाची विनंती.वाडी भरणे आणि ओटी भरण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यानंतर काही गाणी वगैरे होतील. आणि त्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा हि विनंती.

आपली स्नेहांकित, सौ संजिवनी ….

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.

सौ. ….
सौ. ..
आमच्या मामीच्या डोहाळजेवणाला नक्की या हं!
सोहम, शोनू आणि छकुली.

कार्यक्रमाची वेळ संध्याकळी 6 वाजता.
कार्यक्रमाचे स्थळ:-

हे पण वाचा

close