Wedding Invitation Message In Marathi | लग्नासाठी खास आमंत्रण संदेश

Wedding Invitation Message In Marathi (Marriage Invitation Message In Marathi) Lagnache Nimantran Message in marathi, Lagna Quotes in marathi

Wedding Invitation Message In Marathi

सोनेरी पहाट, जन्माची गाठ,
(नवरदेव)च्या संसाराला
(नवरी)ची साथ,
दिवस आहे __वार मुहूर्त आहे खास,
(नवरदेव) आणि (नवरी)च्या डोक्यावर
ठेवा आशीर्वादाचा हात…… !

माहेर सोडून सासरी गेली,
वडिलांची लेक परकी झाली,
बहीण भावाची आशा संपली,
_ परिवाराची मुलगी होती __ परिवाराची सून झाली.

विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन अंतःकरणाचे सुंदर मिश्रण आहे.
जेव्हा एक सुंदर प्रेम कहाणी आपल्या पालकांच्या आशीर्वादासह नवीन जीवनास प्रारंभ करते, तेव्हा तें क्षण आनंददायी असतात.
यासाठी आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आमचा विवाह सोहळा उत्तम पद्धतीने साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो.

एक नाजूक धागा… नातं प्रेमाचं, त्यात गुंफले मनी…
गुंफण विश्वासाचं, मध्यभागी दोरलं…
त्यातून तयार होत मंगळसूत्र,
जे असतं अखंड लेंन सौभाग्याचं,
आग्रहाचं निमंत्रण __ परिवाराचं…

पहिला प्रहर एक क्षण, मेंदीचा बहर एक क्षण, लगीन घाई एक क्षण, वाजे सनई एक क्षण, अंतरपाठ एक क्षण, सर्व सोनेरी क्षणांचा हा जणू एक सण…म्हणूनच आपणांस या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अगत्याचे आमंत्रण

आयुष्याच्या वेलीवर हळुवार पांन..
म्हटले तर दोन जीवांना जोडणारा प्रेमाचा धागा…!
म्हटले तर दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध…!
सात जन्माची गाठी जुळवणारा हा सोहळा…!
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादा शिवाय
अपूर्ण म्हणूनच.. या मंगल प्रसंगी
आपली उपस्थिती हवीच…!

आमचे येथे ईश्वर कृपेने
सोबत दर्शविलेल्या
मंगल कार्यास उपस्थित राहून
वधू वरास शुभाशीर्वाद द्यावे,
ही विनंती.

विवाह! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव. नव्याने जुळणारी एक रेशीम गाठ! एक स्वप्न… दोन डोळ्यांचं, एक हुरहूर… दोन मनांची, एक चाहूल… सात जन्मांची, अशा मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहाचे अगत्याचे आमंत्रण.

वाट नवी, स्वप्न नवे, स्वप्नाला साथ मिळेल प्रेमाची, जिवनाच्या वाटेवरती साथ मिळेल सुख दुःखाची,
अखंड राहो ऋणानुबंध यांच्या संसारासाठी गरज आहे आपल्या आशीर्वादाची, हिच देवाच्या चरणी प्रार्थना आहे ————-परिवाराची.
आमचे येथे श्री समर्थ जयराम बाबा आणि श्री समर्थ गजानन महाराज कृपेने हे मंगल कार्य करण्याचे योजिले आहे. तरी वधू वरास शुभाशिर्वाद देण्यास येण्याचे करावे.

प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।।
ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।।
सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।।
वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।

यंदा घातलाय आमच्या_च्या लग्नाचा घाट,…
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट

लग्न इतक्या गडबडीत ठरलं आणि लग्नाचा मुहूर्तही पण खूपच लवकर ठरला… लग्नाची तयारी करायला खूप कमी वेळ मिळाला, या गडबडीत तुमच्या पर्यंत लग्न पत्रिका येवो न येवो माझे प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण मात्र नक्कीच आहे…

लग्नकार्य म्हणजे, सुख- आनंदाची सभा, तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तुमचा प्रेमळ आर्शीवाद, हाच आमचा आहेर

आणि …. ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी वाढवा या मंगल कार्याची गोडी

साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या महाराष्ट्रात, हिंदू संस्कृतीप्रमाणे मराठमोळ्या वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तरी आपण या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवावी.

You may also like...

close