School Life Quotes In Marathi | शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार

School Life Quotes In Marathi, School day Status, Messages, and Quotes in Marathi, School Life Message In Marathi.

School Life Quotes In Marathi

अजूनही आठवत असेल ना, तुमची ती शाळा आणि शाळेतली तुमची “ती”

हजारो मित्र आले आणि गेले, पण शाळेतील मित्रांसारखे मित्र कधी भेटलेच नाही.

“शाळेत असतांना आयुष्य सुंदर होत, आता आयुष्याची सुंदर शाळा झाली आहे.”

शाळेच्या आठवणी कठीण दिवसात हसू आणू शकतात.

अभ्यासाच्या वयात शाळेत जायला भीती वाटते, कमावण्याच्या वयात शाळेत जाण्याची तळमळ असते.

सर्व काही भेटत या जगात
पण जुने मित्र आणि
त्यांच्या सोबतच्या
आठवणी भेटत नाही!!!

शाळेच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात.

शाळा म्हणल की लहानपणीचे, मजा – मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते.शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता.शाळेचे दिवस परत येत नाहीत. म्हणुन ते तेव्हाच जगायचे असतात.

जे शाळेत मेहनत करायला शिकतात, जीवनाची लढाईही तेच जिंकतात.

शाळेचे ते दिवस आठवले की
उगीचच मोठ झाल्या सारख वाटत
शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण
भाग आहे
शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून
संपला ना तेव्हां कळतो
अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची
शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य
नावाच पुस्तक घडवल

या जीवनात शाळेची स्वप्ने परत येवोत अन माझे जुने हरवलेले मित्र पुन्हा एकत्र येवोत.

ज्या वाहिवरचं चित्र आवडलं
ती वही आवडत्या विषयाला
बाकीच्या इतिहास भूगोलला

शाळेत असतानाचे ते छान दिवस आज मला आठवतात कोणतीही जबाबदारी नसताना नुसती मजा होती.

वर्गात काही समजले
नसताना सुद्धा मास्तर
पुढे डोकं हलवणे

शाळेचा पहिला आणि शेवटचा दिवस सारखाच होता, दोन्ही वेळा डोळ्यांत अश्रू होते.

शाळेत खरा आनंद तर
आपला मित्र
मॉनिटर झाल्यावर व्हायचा..
कारण आपण कितीही बोललो
तरी तो आपलं नाव
फळ्यावर लिहीत नसायचा.

एकत्र बसून खाल्लेले डबे ,Results च्या दिवशी
भीती ,10 चा Board ,परीक्षा,Sandoff
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेलं
अश्रू,आठवणी 10 वर्षाच्या ..

शाळेची गोष्टच निराळी आहे आईनंतर तीच आपल्याला जगायला शिकवते.

“आयुष्यात किती पण नवीन मित्र भेटू द्या पण आपण शाळेतल्या मित्रांना कधीच विसरत नाही.”

पहिल्या बेंच वर बसणारे
शाळेला विसरू शकत नाही..
आणि लास्ट बेंच वर बसनाऱ्याना
शाळा कधीच विसरू शकत नाही..

“शाळेतला पहिला दिवस आजही तितकाच आठवतो, तुझा राग गेला कि दोन बोट पुढ करून जेव्हा “दो” म्हणतोस.”

शाळा ही अशी जागा आहे जिथे आपण इतरांबद्दल शेअर करणे, काळजी घेणे आणि प्रेम करणे शिकवले जाते.

अजूनही आठवतात ते दिवस…
पावसाचा काळोख,
सर्वत्र अंधारमय वातावरण,
पावसाची सर आमच्या वर्गात,
चालू असलेला आमचा तास बंद,
आणि…
वर्गात घातलेला एकच धुमाकूळ.

“लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो, पण आता शाळेची आठवणीने रडायला येते.”

आज कितीही मोठ्या हॉटेलात
जेवायला बसलो तरी
शाळेत जेवायला बसायचो तसा
आनंद अता मिळत नाही

आज कालची पहीलीची मुले
केसांना जेल लावून शाळेत जातात
आणि एक आमचा जमाना होता…
जेव्हा आमची आई खोबरतेल लावून
असा भांग पाडून दयायची की
चक्रीवादळ जरी आल तरी
इकडचा केस तिकडे जायचं नाही..

हे पण वाचा

close