Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din | छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिन अभिवादन

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din:- Chatrapati Sambhaji Maharaj Balidan din 2024 Marathi Status, Sambhaji Maharaj Balidan Din

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din

गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत |
सुर्याहूनी ही अती दाहक धर्मभक्ती
स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्रचित्ती ||
छत्रपती संभाजी राजे यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।

महापराक्रमी
धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज
यांना पुण्यतिथीनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा!

कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

शौर्याचा सर्वोच मानबिंदू,
छत्रपती संभाजी महाराज
यांना स्मृतिदिनानिमित्त,
त्रिवार वंदन!

शत्रू ही मरताना ज्याचं कौतुक करून गेला
असा वाघाचा छावा संभाजी
सह्याद्रीचा दूसरा राजा होऊन गेला
शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

हिमालयाएवढे शौर्य असलेले, महापराक्रमी
संभाजी महाराज
यांना स्मृतीदिनानिमित्त
विनम्र अभिवादन..!

लाचार होऊनी कधीं कधीं ना जगावें,
त्याहुनी वीष गिळुनी त्वरया मरावें..
शिवसिंहसदृश बनू अति स्वाभीमानी,
संभाजी नाही झुकले यमयातनांनी…
शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

रणांगणी रक्ताने माखले अंग जरी,
शौर्यास ज्याच्या किंचीतही भंग नाही,
मृत्यूस न भीता अवघा रणकंद झाला,
तया प्रणाम कोणी दुजा वंद्य नाही..
छत्रपती संभाजी महाराज,
यांच्या बलिदान दिनानिमित्त,
विनम्र आदरांजली !

पाहुनी शौर्य तुझंपुढे
मृत्यूही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी
माझा शंभू अमर झाला
पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा..
ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा..
हिंदुत्वाचे महान रक्षक धर्मवीर,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..!

११, मार्च
तुमच्या तेजाने तळपतो
पुरंदरचा माथा…
सह्याद्रीच्या कडेकपारी
सांगतात शंभूराजे
तुमच्या पराक्रमाच्या गाथा
पाहून शौर्य तुमचे मृत्यूही
नतमस्तक झाला…
शंभूराजे मृत्यूला जिंकून
तुम्ही मृत्युंजय झाला…
मुत्युंजय
देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या
छत्रपती संभाजी महाराजांना
बलिदान दिनानिमित्त
मानाचा मुजरा…

हे पण वाचा

close