Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din:- छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. संभाजी राजे यांना 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला होता, छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता.
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनादिवशी कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिवभक्त यांच्यासोबत शेअर करुन शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करा.
हिमालयाएवढे शौर्य असलेले
महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती
श्रीशंभुराजे यांना राज्याभिषेक
दिनानिमित्त मानाचा मुजरा!
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन!
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
राज्याभिषेक दिनानिमित्त
श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!
स्वराज्याच्या मातीसाठी अमर झालेले
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!