Children’s Day Wishes Quotes In Marathi: बालदिनानिम्मित शुभेच्छा संदेश मराठी

Children’s Day Wishes Quotes In Marathi (Children’s Day Messages In Marathi) Happy Children’s Day Wishes In Marathi.

14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा म्हणून बाल दिन साजरा केला जातो. बालदिनाच्या निमित्ताने काही खास शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

Children’s Day Wishes Quotes In Marathi

वयाने मोठ्या पण मनाने लहान
अशा प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने साजरा करा आणि मुलांना भरपूर प्रेम द्या. हॅपी चिल्ड्रन्स डे.

सकाळ नाही, संध्याकाळ नाही
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता
बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता. Happy Childrens Day

काही वेळा शाळा बुडवणं,
मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं.
कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की,
शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात.
या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते
म्हणूनच मला तुझी आली.

जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day.

जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मनाची निरागसता,
ह्रदयाची कोमलता,
ज्ञानाची उत्सुकता,
भविष्याची आशा…
उद्याचा देश घडविणाऱ्या
बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा !

हे पण वाचा

close