Dohale Jevan Wishes In Marathi :- Dohale Jevan Message And Wishes In Marathi, Baby Shower Wishes In Marathi, Dohale Jevan Shubhechha
आम्हाला आतुरता आहे चिमुकल्या पावलांची, आम्हाला आतुरता आहे गोड आवाजाची, आम्हाला आतुरता आहे तुझ्या चेहर्यावरचा तो आनंद पाहण्याची, ज्यादिवशी तुझं बाळ तुझ्या कुशीत असेल. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
जगातील सर्व सुखे तुझ्या आई होण्यापूढे व्यर्थ आहेत. तुझ्या होणार्या बाळावर व तुझ्यावर देवाची कृपादृष्टी नेहमी रहावी. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
तुझं आयुष्य आता पहिल्यासारखं जरी नाही राहीलं, तर चांगल्यासाठी हे बदल होत आहेत. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डोहाळे जेवण आहे तुझ्यासाठी खास आणि आहेत आमच्याही शुभेच्छा
कोणीतरी येणार येणार ग… ज्याच्या कोमल स्पर्शाने तुझं अंग सारं न्हाऊन जाणार ग. त्याच्या गोड आवाजाने घर सारं दुमून जाणार ग. तोच होणार तुझा आधार, तोच तुझ्या भाग्याचा दिवा ठरणार ग. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा
आयुष्यातील सर्वात मोठं सुख आता तुझ्या आयुष्यात येणार आहे. या आनंदासाठी तू तयार राहा
तुझ्या बाळासाठी आयुष्यात फक्त प्रेम, सुख, आनंद आणि समाधान मिळो याच शुभेच्छा या डोहाळे जेवणाला खास तुझ्यासाठी
लक्ष्मीच्या रूपाने गोड परी यावी तुझ्या दारी, डोहाळ जेवणाच्या तुझ्या या सोहळ्याला रंगत यावी न्यारी, डोहाळ जेवणाच्या सोहळ्याला शुभेच्छा द्यायला जमलो आम्ही मंडळी सारी. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
लहान बाळांचे हसणे, त्यांचे आपले असणे आणि त्यांचा निरागस सहवास लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे, तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी डोहाळे जेवणाला खास आशीर्वाद आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!
आई होणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं सुख आहे, ते सुख आता थोड्याच दिवसात तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खूप सारे सुख व आशीर्वाद मिळो हीच देवाकडे प्रार्थना डोहाळ जेवणाच्या गोड शुभेच्छा.
संपूर्ण घरादाराला परिपूर्ण करणारी कळी तुझ्या अंगणात फुलणार आहे, त्या कळीच्या मधुर सुगंधाने तुम्हा सर्वांचे आयुष्य दरवळणार आहे. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
पेढा कि बर्फी याचा विचार आता करू नको, ताटात वाढलेल्या निरनिराळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घे आणि भरपूर खा. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
तुझ्या डोहाळे जेवणाची तयारी सर्व झाली, हिरव्या साडीतली होणारी आई तू शोभतेच भारी, रंगीबिरंगी फुलांची सजावट पूर्ण झाली, नवीन पाहुण्याच्या आगमनाला सर्व मंडळी उत्सुक झाली. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.