E-Shram Card information in Marathi | ई श्रम कार्ड माहिती मराठी

E-Shram Card information in Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ई श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे काय आहे , हे जाणून घेणार आहोत.

E-Shram Card information in Marathi

E-Shram Card information in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम कार्ड बनविण्या करिता पोर्टल सुरू केले आहे. ज्या मध्ये असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत.

तसेच या पोर्टल द्वारे जे असंघटित क्षेत्रातील कामगारांनी जर नोंदणी केली असेल तर नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल जे एक वर्षासाठी असेल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास १ लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभणार आहे.

ई-श्रम कार्ड मिळवण्या करिता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचं आहे, आणि या अर्जासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क नाही

मित्रानो आता पर्यंत बरेच जणांनी ई-श्रम कार्ड नोंदणी केली आहे, आणि ई-श्रम कार्ड सुद्धा बनविले आहे परंतु अद्याप काही लोकांना माहित च नाही कि याचे नेमके फायदे काय आहे आणि ई-श्रम कार्ड काय आहे आणि कशाकरिता हे बनवायचे

E -sharam Card Meaning in Marathi ई-श्रम कार्ड म्हणजे काय?

देशा मधील कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार हे ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.

या ईश्रम कार्ड साठी या प्रवर्गात मोडणारे नोंदणी करू शकता जसे कि बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगार

नोंदणीसाठी वय

ई-श्रम कार्ड मिळवण्या करिता या साठी वय १६ वर्षांपेक्षा जास्त आणि ५९ या व्यामधील कामगार ई-श्रम कार्ड कार्ड साठी नोंदणी करू शकते.

ई-श्रम कार्ड साठी कोण नोंदणी करू शकत नाही?

ई-श्रम कार्ड साठी पोर्टलवर नोंदणी करण्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आयकर (TAX) देत नाही , म्हणजेच जर कामगार कर(TAX) भरणारा असेल तर त्याला ई-श्रम कार्ड साठी पोर्टलवर नोंदणी करण्याचा अधिकार नाही. फक्त ईश्रम कार्ड साठी असाच कामगार नोंदणी करू शकतो, जो कि EPFO, ESIC किंवा NPS चा सदस्य नाही.

E Shram Card Online Apply 2022 ईश्रम कार्ड साठी संकेतस्थळावर नोंदणी कशी करायची ?

जे असंघटित क्षेत्रातील कामगार असतील त्यांना थेट संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे, नोंदणी करण्या साठी आपल्या eshram.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल

तसेच या यासाठी १४४३४ हा राष्ट्रीय नि:शुल्क नंबर संपर्क साधून आपण मार्गदर्शन घेऊ शकता , कामगारांना आपला आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाच्या साहाय्याने ई-श्रम संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

त्याच बरोबर ईश्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी आपली जन्म दिनांक, मूळ गाव, संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती आपल्या ईश्रम कार्ड नोंदणी करता वेळी द्यावी लागेल

ईश्रम कार्ड नोंदणी झाल्यावर कामगारांना १२ अंकी अनोखा संकेतांक (युनिक कोड) असलेले ई-श्रम ओळखपत्र दिले जाईल या मध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

हे पण वाचा

close