Sukanya Samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धि योजना माहिती मराठी

Sukanya Samriddhi Yojana in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत सुकन्या समृद्धि योजना बद्दल सविस्तर माहिती. सुकन्या समृद्धि योजना म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय आहे व अटी, नियम काय आहे हे जाणून घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी ही योजना मुलींना भविष्यात शिक्षण घेताना किवा लग्न करताना येणार्‍या अनेक अडचणी यांचा विचार करून चालू करण्यात आलेली आहे, हि योजना केंद्र सरकार द्वारा 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या या अभियाना अंतर्गत ही योजना सुरू केली होती.

Sukanya Samriddhi Yojana in Marathi

योजनेचा थोडक्यात तपशील:-

योजनेचे नावसुकन्या समृद्धी योजना
योजना घोषणा दिनांक1 एप्रिल 2014
योजनेचा उद्देशमुलींच्या भविष्यासाठी पैसे बचत
सुकन्या समृद्धि योजना खाते उघडण्याची वयोमर्यादा0 वर्षे आणि कमी
योजनेचे लाभार्थी0 ते 10 वर्षे वयाच्या मुली
ठेवींचा कालावधी खाते उघण्याच्या तारखेपासून २१ वर्ष
योजनेत गुंतवणूक रक्कमकमीतकमी 250 रुपये पासून 150000 रुपये
योजना फॉर्म पद्धतऑनलाइन आणि ऑफलाइन

केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूपसाऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे.

या योजने मध्ये मुली चे आई वडील तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी लागणारा खर्च जमा करू शकतात, तसेच मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.

या योजनेचा लाभ घेण्या करीता मुलींच्या आई वडिलांना कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. आणि या खात्यास बँक किंवा पोस्ट खात्यास (Sukanya Samriddhi Account) असेही म्हणतात.

सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

१) सुकन्या समृद्धी या योजनेअंतर्गत १० वर्ष वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलीच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात ‘सुकन्या समृद्धी ‘ खाते उघडता येते ,या खात्या मध्ये किमान १०००रु ठेवावे लागतात . एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल १.५ लाख रु टाकता येतात.

२ ) सुकन्या समृद्धी योजने चे खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास ( जी मुदत आधी असेल ती ) व्याजासह ठेव परत मिळते.

३) या योजने अंतर्गत मुलगी १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुदत असते. उर्वरित रक्कम पुढे केव्हाही (२१ वर्षे मुदत संपेपर्यंत ) काढ़ता येईल

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

योजनेचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी लागणार जो खर्च त्याची गुतवूणूक आणि बचत ठेव साठीची योजना आहे. त्यामुळे या योजनेत मुलींच्या शिक्षण व लग्नासाठीचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते.
  • सुकन्या समृद्धी या योजने अंतर्गत शासनाकडून जाहीर केल्या प्रमाणे व्याजदर मिळत राहतो. ही योजना शासनाची असल्याने सुरक्षित व्याजदर मिळेल याचा विश्वास मिळतो.
  • सुकन्या समृद्धी या योजनेमध्ये सरकारकडून पैशाची हमी दिली जाते. म्हणजेच आपण केलेली गुंतवणूक ही सरकारकडून सुरक्षित झालेली आहे.
  • या योजने अंतर्गत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वयाच्या १८ व्या वर्षी जमा रकमेच्या ५०% रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी

  • सुकन्या समृद्धि योजना २०२१ अंतर्गत कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकेल.
  • या योजनेंतर्गत १० वर्षाखालील मुलींचे खाते उघडले जाऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी या योजने साठी लाभार्थी हे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सुकन्या समृद्धी ही योजना २१ वर्षाची जरी असेल तर मुलीच्या वयाच्या १५ वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न जर 21 वर्षाच्या आत झाल्यास तिला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५०/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सुकन्या समृद्धि योजना फॉर्म
  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पैसे जमा करणार्‍या व्यक्तीचे ओळखपत्र / आधार कार्ड / पण कार्ड
  • मुलीच्या आई-वडिलांचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी

खालीलीपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.

  • इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
  • इंडियन बँक Indian Bank
  • आईडीबीआई बँक Idbi Bank
  • आईसीआईसीआई बँक Icici Bank
  • देना बँक Dena Bank
  • कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
  • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank Of India
  • केनरा बँक Canara Bank
  • बँक ऑफ महाराष्ट्र Bank Of Maharashtra
  • बँक ऑफ इंडिया Bank Of India
  • बँक ऑफ बड़ौदा Bank Of Baroda
  • एक्सिस बँक Axis Bank
  • आंध्रा बँक Andhra Bank
  • इलाहाबाद बँक Allahabad Bank
  • भारतीय स्‍टेट बँक State Bank Of India
  • स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank Of Mysore
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank Of Hyderabad
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank Of Travancore
  • स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर State Bank Of Bikaner And Jaipur
  • स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank Of Patiyala
  • विजया बँक Vijaya Bank
  • यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank Of India
  • यूनियन बँक ऑफ इंडिया,
  • यूको बँक Uco Bank
  • सिंडिकेट बँक Syndicate Bank
  • पंजाब नेशनल बँक Panjab National Bank
  • पंजाब एंड सिंध बँक Panjab And Sind Bank
  • ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank Of Commerce

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

हे पण वाचा