Ghatasthapana Wishes In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना बद्दल माहिती, नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा असतो, नवरात्रीची सुरुवात घटस्थापना पासून होते, घटस्थापना हा नवरात्रीच्या दरम्यान केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे. कलश स्थापना हे घटस्थापनेचे दुसरे नाव आहे, घटस्थापना नंतर च्या 9 दिवसानंतर दसरा येतो.
घटस्थापनेच्या दिवशी तांब्यात किंवा मातीच्या भांड्यात नवं धान्य रूजवलं जातं. हे रूजवण दसर्या दिवशी केसात माळलं जातं. तर नवरात्रीच्या नऊ रात्री मांडवाला एक माळ माळून, अखंड नंदादीप तेवत ठेवून श्रीमहाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांचं पूजन केले जातं.
यंदा घटस्थापना 15 अक्टूबर दिवशी केली जाणार असून पुढील 8 दिवस नवरात्रीचा जागर केला जाणार आहे.
आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे नवरात्रि व घटस्थापना मराठी शुभेच्छा संदेश आपण आपले कुटुंबीय व मित्र मंडळीसोबत शेअर करू शकतात. व येत्या नवरात्रीच्या शुभेच्छा त्यांना देऊ शकतात. तर चला सुरू करूया..
घस्थाटपना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा
शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
घटस्थापनेच्या मंगलदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
आजपासून सुरू होणा-या नवरात्र आणि घटस्थापना ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा… शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
घटस्थापनेच्या शुभेच्छा