Govardhan Puja Information Marathi | गोवर्धन पूजा माहिती मराठी मध्ये

Govardhan Puja Information Marathi :- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत गोवर्धन पूजा या बद्दल माहिती, दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पूजनाचा उत्सव साजरा केला जातो, हिंदू पौराणिक कथांनुसार वृंदावनमधील लोकांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राचा पराभव केला होता आणि ही पूजा त्याच उत्सवाप्रीत्यर्थ केली जाते.

Govardhan Puja Information Marathi

गोवर्धन पूजा ही अन्नकूट उत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय या दिवशी विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात. तसेच या दिवशी गाय, बैल आणि इतर जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन व फुलांचा हार घातला जातो. गोमातेला मिठाई भरवल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

हे पण वाचा

close