Indian Air Force Day Wishes in Marathi:- Indian Air Force Day 2023, Indian Air Force Day Quotes, Messages, Status, Thoughts.
देशात दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी ‘भारतीय वायूसेना दिवस’ (Indian Air Force Day 2023) साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1932 मध्ये हवाई दलाची स्थापना झाली होती, स्वातंत्र्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्स म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर त्यातून ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकण्यात आला. आज भारतीय हवाई दलाची कामगिरी पाहता प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. तर वायूसेनेच्या स्थापना दिवसानिमित्त तुम्ही आपल्या मित्रपरिवार मध्ये शुभेच्छा देऊ शकता.
भारतीय वायु क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि प्राणपणाने सांभाळणाऱ्या, असामान्य शौर्य आणि देशाच्या हवाई सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या भारतीय वायुसेनेच्या सर्व जवानांना वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी निष्ठेने आणि समर्पित भावनेने आपले कर्तव्य बजवणाऱ्या भारतीय वायुसेनेतील सर्व जवानांना वायुसेना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य आणि शौर्याचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे.
भारतीय वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेच्या सर्व वीर योद्धाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
भारतीय वायुसेना दिन,
मातृभूमीच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या वायुसेनेच्या सर्व वीर योद्ध्यांना सलाम !