Kartiki Ekadashi Wishes In Marathi (Kartiki Ekadashi Messages 2022) Kartiki Ekadashi Status, Prabodhini Ekadashi 2022 Wishes.
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
कार्तिकी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा!
पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला, सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला, हीच प्रार्थना करतो पांडुरंगाल, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरीये, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे, माझ्या माणसांना, बळीराजाला सुखात राहू दे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल|
करावा विठ्ठल जीवभाव||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनियां||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी|
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा||
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी|
सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!!!
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली रे…
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तु आम्हा
लेकरांची विठुमाऊली….
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी
विठाई जननी भेटे केव्हा…
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
सावळे सुंदर, रूप मनोहर|
राहो निरंतर ह्रदयी माझे||
कार्तिकी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!