Mahaparinirvan Din Quotes Marathi | महापरिनिर्वाण दिन स्टेटस

Mahaparinirvan Din Quotes Marathi:- (6 December Mahaparinirvan din status & Quotes in Marathi) बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन मराठी संदेश.

Mahaparinirvan Din Quotes Marathi

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही..

पोटाची भूक तर भागवावीच,
पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,
शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने आज भारत देश चालतोय..
अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !

आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे..
ना कोण्या खासदाराचा हात आहे..
पण ज्याचा हात आहे, तो सगळ्यांचा बाप आहे..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास कोटी कोटी प्रणाम..!

शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे..
जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे..
भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…
घासातील घास दुसऱ्याला देणे,
ही मराठी माणसाची संस्कृती आहे..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही,
तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे,
आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..
जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते..
याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..
– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
जय भीम !

विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
विनम्र अभिवादन..!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!

कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते,
पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली..
जय भीम!

तुमच्याकडे २ रुपये असतील,
तर १ रुपयाची भाकरी घ्या,
आणि १ रुपयाचे पुस्तक..
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,
तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हे सुद्धा वाचा

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

हे पण वाचा

close