Makar Sankranti Ukhane in Marathi | मकर संक्रांती आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खास मराठी उखाणे

Makar Sankranti Ukhane in Marathi (Makar Sankranti 2024 Ukhane) Makar Sankranti Ukhane, Ukhane For Makar Sankranti.

Makar Sankranti Ukhane in Marathi

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
…रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…
…..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,
_रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास
…रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात,
….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात.

सण पहिला मकरसंक्रांतीचा
मान हळदी कुंकवाचा
मान सुहासिनीचा आणि
….चा जोडा राहो साताजन्माचा

संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वान,
….राव मुळे मिळाला मला सौभाग्याचा मान.

काकवी पासुन बनवतात गुळ ….रावांचे नाव घेवुन वाटते तुम्हाला तिळगुळ

आज मकर संक्रांत म्हणुन जेवन केले गोड …रावांची मला आहे खुप ओढ

संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान
…रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचा कुंकाच वान.

संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण
…रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण.

मोत्याची माळ सोन्याचा साज
…रावांच नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज.

गुलाबाचे फूल लावते वेणीला
_रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी,
दिपक रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी.

ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
_ रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी

मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड,
__ राव माझे नुसते पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा
आणि _ चा जोडा राहो साता जन्माचा.

तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा
……रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.

हे पण वाचा

close