Mangalagaur Ukhane in Marathi | मंगळागौरी निमित्त खास मराठी उखाणे

Mangalagaur Ukhane in Marathi:- Mangalagaur Ukhane 2023, Mangalagaur Ukhane marathi

Mangalagaur Ukhane in Marathi

श्रावणात बरसतात सरींवर सरी, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी …रावांची सखी मी बावरी

मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर,….रावांचे नाव घेते, माझे भाग्य थोर

आकाशात कडकडल्या विजा…रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा

मेघमल्हार बहरताच, श्रावणसर कोसळते, …रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…मंगळागौरीच्या दिवशी ….रावांचे नाव घेते आणि फुलवते संसाराचा फुलोरा

भर श्रावणात पाऊस आला जोरात…रावांचे नाव घेते मंगळगौरीच्या दिवशी ….च्या घरात

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, मंगळागौरीच्या दिवशी आले एवढे महत्त्व ….च्या नावाला

अथांग वाहे सागर संथ चालते होडी मंगळागौरी सुखी ठेवो …..रावांची आणि माझी जोडी

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव …च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव, मात्र मंगळागौरीच्या दिवशी खाते थोडा भाव

मंगळागौरी तू आशीर्वाद दे येऊ दे भाग्याला भरती….रावांच्या उत्कर्षाची कमान नेहमी राहू दे चढती..!

मंगळागौरीच्या दिवशी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, …रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट

मंगळागौरीच्या दिवशी माता पार्वतीची पूजा केली जाते. गौरी हा आदिशक्ती महामायेचा अवतार असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. ती शिवाची शक्ती आहे.

हे पण वाचा

close