Marathi Bhasha Din Quotes in Marathi (Marathi Bhasha Din Wishes In Marathi) Marathi Bhasha Din Status in Marathi, Language Day
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय
रुजवू मराठी फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी दिनाच्या शुभेच्छा
मराठी आहे माझी माती
मराठी माझा अभिमान
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य,
हाच माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी
शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते
सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय
माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा शब्द,
माझे विचार,
माझा श्वास,
माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी
मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा!