National Education Day Quotes in Marathi | राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शुभेच्छा

National Education Day Quotes in Marathi (Maulana Abul Kalam Azad Quotes in Marathi) दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.

National Education Day Quotes in Marathi

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात
विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

ज्ञान ही शक्ती आहे, माहिती मुक्त आहे
प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक समाजात शिक्षण
प्रगतीचा एक भाग आहे
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

शिक्षण म्हणजे
फक्त वही-पेन नव्हे
तर बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे,
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!

हे पण वाचा

close