Navratri Colours 2022: (Shardiya Navratri 2022) नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या (Durga Mata) प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये नऊ रंगाना विशेष महत्व आहेत. या वर्षी शरद नवरात्रि २६ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे, कोणत्या दिवशी कोणता रंग आणि त्याचे महत्व जाणून घेऊया.
संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
पहिला दिवस – पांढरा रंग (White) – पहिला दिवस म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जातात. या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. पांढरा रंग हा श्वेत, शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे.
दुसरा दिवस – लाल रंग (Red) – दुसरा दिवस म्हणजेच 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग शुभ मानला जातो. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस – निळा रंग (Blue) – तिसरा दिवस म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 रोजी बुधवारी चन्द्रघंटा देवीची पूजा केली जाते. दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे.
चौथा दिवस – पिवळा रंग (Yellow) – चौथा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर 2022 रोजी गुरुवारी कुष्मांडी देवीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाला सौभाग्याचे, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते.
पाचवा दिवस – हिरवा रंग (Green) – पाचवा दिवस म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे.
सहावा दिवस – राखाडी रंग (Grey) – सहावा दिवस म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी रंग शुभ मानला जातो.. राखाडी रंगाला बुद्धिमत्तेचे प्रतिक मानले जाते.
सातवा दिवस – नारंगी रंग (Orange) – सातवा दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी म्हणजेच सप्तमीला कालरात्री देवीची पूजा केली जाते, या दिवशी नांरगी रंग शुभ मानला जातो.. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
आठवा दिवस – मोरपंखी रंग – आठवा दिवस म्हणजेच 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी म्हणजेच अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी रंग शुभ मानला जातो. मोरपंखी रंग समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
नववा दिवस – गुलाबी रंग (Pink) – नववा दिवस म्हणजेच 4 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारी म्हणजेच नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंग शुभ मानला जातो.. गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि स्त्री शक्तीचे प्रतिक आहे.