Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic Day Wishes In Marathi (Republic Day Wishes And Quotes In Marathi) Prajasattak Din Messages in Marathi

Republic Day Wishes In Marathi

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

मिळालेले स्वातंत्र्य अनुभवा, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

“रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक, तरी सारे भारतीय आहेत एक, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!”

“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close