Sant Dnyaneshwar Quotes in Marathi
माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो
– संत ज्ञानेश्वर
कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे
मी स्त्री व्हावे कि पुरुष, काळा कि गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणे , हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
– संत ज्ञानेश्वर
आज जरी यश, सुख, समृद्धी
माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते
याची सतत जाणीव ठेवून,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
– संत ज्ञानेश्वर
माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती,
सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते.
त्यामुळे ते कसेही असले तरी
त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
– संत ज्ञानेश्वर
ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात