Sant Kabir Quotes In Marathi | संत कबीरांचे विचार

Sant Kabir Quotes In Marathi, Sant Kabir Dohe In Marathi

Sant Kabir Quotes In Marathi

हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,
आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना ।

अर्थ : कबीरदास या दोह्या मध्ये म्हणतात कि हिंदुना राम प्रिय आहे आणि मुस्लिमांना रहमान प्रिय आहे. या गोष्टीवर ते आपापसात भांडतात पण ते सत्य का नाही जाणत.

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।

अर्थ : जेव्हा मी जगात ‘वाईट’ शोधायला निघालो तेव्हा मात्र कुणीच वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी स्वतः अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।

अर्थ : पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले असे नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच (ढाई) शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.

साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय ।

अर्थ : जसे धान्यातील खडे, कचरा स्वच्छ करण्यासाठी सूप वापरलं जातं तश्याच प्रकारच्या साधू, विद्वानांची गरज आहे जे समाजातील चांगल्या गोष्टीला टिकवून ठेवतील आणि नको असलेल्या गोष्टींना उडवून लावतील.

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।

अर्थ : माळीने झाडाला कितीही घडाभर पाणी टाकलं तरी ऋतू आल्यावरच त्याला फळे लागतात तसेच धैर्य ठेवून काम केल्यानेच सर्व काही सिद्धीस जाते असे कबीर म्हणतात.

हिरा तहां न खोलिए, जहं कुंजडन की हाटी
सहजै गांठी बांधिकै, लगिए अपनी बाटी

अर्थ : आपल्या जवळचा हिरा काचऱ्याच्या बाजारात बाहेर काढू नका
उलट! हळूच गाठ बांधून,आपआपल्या वाटेला लागा

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।

अर्थ : ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. यावेळी उपमा देतांना कबीर म्हणतात की तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.

दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,
अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।

अर्थ : माणसाच्या स्वभावाविषयी बोलताना कबीर म्हणतात की माणूस दुसऱ्यांचे दोष बघता बघता स्वतःचे दोष विसरतो ज्याचा कुठे अंतच नाही.

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय ।

अर्थ : रात्र झोपण्यात घालवली आणि दिवस खाण्यात, मनुष्य जन्म इतका अनमोल होता जो तू असा वाया घालवलास. आयुष्य सार्थकी न लावणाऱ्या जन्माची किंमत (मोल) शेवटी फक्त एका कवडी इतकी राहिली.

अति का भला न बोलना, अति की भली न चूप,
अति का भला न बरसना, अति की भली न धूप।

अर्थ : जास्त बोलणंही योग्य नाही आणि जास्त गप्प बसून राहणे चांगलं नाही जसं खूप पाऊस आणि खूप उन दोन्हीही प्रकृतीसाठी हानिकारक असतात. याचा अर्थ असा की सर्व काही प्रमाणात असायला हवं.

हद्द चलै सो मानवा, बेहद चलै सो साध ।
हद बेहद दोऊ तजै, ताकर मता अगाध ॥

अर्थ : बंधनात जो राहतो तो मानव, जो बंधन मानित नाही तो साधू ।
जो बंधने आणि बंधनविरहित अशा दोन्हीचाही त्याग करतो, त्याचेच विचार अगाध असतात.

जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही |
सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही |

अर्थ : जेव्हा मला अहंकाराने घेरलं होतं तेव्हा देव दिसला नाही पण गुरूच्या उपदेशाने, त्याच्या मार्गदर्शनातून मला ज्ञानाचा प्रकाश दिसला आणि माझ्या अज्ञान रुपी अंधकार दूर झाला.

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।

अर्थ : कबीर म्हणतात निदा करणाऱ्या किंवा आपल्या बद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या जेवढं जवळ ठेवता येईल तेवढं ठेवायला हवं कारण असा माणूस आपले दोष दाखवून, बिना साबण पाण्याचचं आपल्याला स्वछ करत असतो.

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार ।

अर्थ : मनुष्य जन्म फार दुर्लभ असल्याचं कबीर या दोह्यात म्हणतात. मानव शरीर वारंवार मिळत नाही जसं झाडावरून गळून पडलेलं पान पुन्हा झाडाला जोडता येत नाही.

कबीरा खड़ा बाज़ार में, मांगे सबकी खैर,
ना काहू से दोस्ती,न काहू से बैर.

अर्थ : कबीर म्हणतात कि या जगात सर्वांच भलं होवो. कोणाशी मैत्री झाली नाही तरी चालेल पण दुष्मनी होऊ नये.

हे पण वाचा

close