Shivneri Fort History In Marathi | शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

Shivneri Fort History In Marathi:- नमस्कार मित्रानो eStartup idea मराठी ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे, इथे आपण जाणून घेणार आहोत शिवनेरी किल्ल्याबद्दल.

Shivneri-Fort-History-In-Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्यावर झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला, १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर रयतेचा राजा, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज याचा जन्म झाला,त्यामुळे या गडाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर शहराजवळ, नाणेघाट डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे, शिवनेरी किल्ला पुण्यापासून सुमारे अंदाजे १०५ कि.मी.अंतरावर आहे.

ह्या किल्ल्याला चारही बाजूनी कठीण चढाव असून याला जिकंण्यास कठीण असा बाले किल्ला आहे, किल्ल्यावर शिवाई देवी चे छोटे मंदीर व राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी राजे याच्या प्रतिमा देखील आहे.

शिवनेरी या किल्याचा आकार शंकराच्या पिंडी सारखा आहे, तसेच या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ३५०० फूट इतकी आहे.

Shivneri Fort History In Marathi

‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी किल्ल्यावर झाला आणि त्यांचे बालपण इथेच त्यांनी घालवले.

११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

पण इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये मध्ये शिवाजी महाराज आणि त्यांची आई यांनी किल्ला सोडला. यानंतर 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1673 च्या काळात शिवाजी महाराजांनी गड जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. 40 वर्षानंतर हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात 1716 मध्ये मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला आणि त्यांनी पेशव्यांच्या ताब्यात दिले.

शिवनेरी किल्ल्यावर कसे पोहोचाल :-

पुणे हा मुख्य ठिकाण आहे जिथून शिवनेरी किल्ल्यावर जाता येते.

रोड मार्गे: पुणे शहर ते शिवनेरी हे अंतर सुमारे ९५ किमी आहे. पुणे आणि भारतातील मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर आणि गोवा या विविध शहरांमध्ये एसटी आणि खाजगी सेवा नियमितपणे सुरू असतात. जुन्नरच्या वाटेवरून एक बस जाऊ शकते. पुण्यातून किल्ल्यापर्यंत टॅक्सी किंवा अन्य भाड्याने वाहने घेता येतात व आपण शिवनेरी किल्ल्यावर पर्यंत पोहचू शकता

रेल्वेमार्गे: पुणे रेल्वे स्टेशन शिवनेरी जवळचे स्टेशन आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि बर्‍याच शहरांमध्ये रेल्वेने जोडलेले आहे. गडावर जाण्यासाठी आपण स्टेशनवरून बस किंवा टॅक्सी प्रवास करू शकता

विमानाने: पुणे-लोहेगाव विमानतळ शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-

शिवनेरी किल्यावर अशी बरीच मौल्यवान ठिकाणे पाहायला मिळतात शिवनेरीला एकूण 7 दरवाजे, महा दरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, हटी दरवाजा, परगंचना दरवाजा, कुलबख्त दरवाजा आणि शिपाई दरवाजा आहेत.

जन्मस्थळ:- छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थान आहे.
पुतळे:- किल्ल्याच्या दक्षिण टोकाला जिजाबाई आणि लहान शिवाजीची शिल्पे आहेत.
शिवमंदिर:- किल्ल्यात श्री शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवले गेले.
बदामी तलाव :– बदामी तलाव नावाचा तलाव किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूला आहे.
प्राचीन लेणी:- या किल्ल्यात काही भूमिगत बौद्ध लेण्या आहेत.
पाण्याचे साठे:- किल्ल्यात अनेक खडक पाण्याच्या टाक्या आहेत. गंगा आणि जमुना यापैकी पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत.
मोगल मशिद:- शिवनेरी किल्ल्यावर मुघल काळातील एक मशीद देखील आहे.

हे सुद्धा वाचा:-

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद | SHIVAJI MAHARAJ GARAD LYRICS


या पोस्टमध्ये लिहिलेली माहिती येथून घेतली आहे:- wikipedia

Note:- मित्रानो दिलेल्या माहिती माहिती मध्ये काही चुका अडल्यास किंवा माहिती मध्ये सुधार करायचा असल्यास आम्हला संपर्क करा आम्ही यात लगेच सुधार करू धन्यवाद.

हे पण वाचा

close