Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi:- महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विचारांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे, शत्रूच्याही मनात धडकी भरवणार्‍या शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा आज 21 व्या शतकामध्येही प्रेरणादायी आहेत. मग शिवरायांचे विचार पुढील पिढी पर्यंत नेण्यासाठी त्यांचेच हे प्रेरणादायी विचार तुम्ही नक्की शेअर करा.

ShivJayanti 2022

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
Raja Shiv Chhatrapati
Shivaji Maharaj Ki Jay

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा
इतिहास माहिती पाहिजे
Har Har Mahadeo
Jay Shivaray

आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
|| शिवछत्रपती ||
Jay Shivaji Jay Bhavani

ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.

हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय

जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती.

वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

आयुष्य छान आहे,
थोड लहान आहे परंतु,
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद | SHIVAJI MAHARAJ GARAD LYRICS

Shivjayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा

Shivgarjana Lyrics in Marathi | शिवगर्जना

हे पण वाचा

close