संत तुकडोजी महाराज सुविचार | Tukdoji Maharaj Quotes In Marathi

Tukdoji Maharaj Quotes In Marathi

Tukdoji Maharaj Quotes In Marathi

ताकदवान तो नसतो की, जो दुसऱ्याला खाली पाडतो. तोच ताकदवान खरा की, जो पडलेल्याला उचलून नीतिपथावर आणतो.

शस्त्रे घर्षणाने चमकतात आणि शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो.

लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. याकरिता आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका आणि सर्वाशी समान भावनेने वागा.

दुसऱ्याच्या अडलेल्या कामाकरिता घरात वस्तू असून नाकारू नका, म्हणजे तुमच्याकरिताही लोक धावून येऊन तुमच्या अडचणी दूर करतील.

लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा ईमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो.

You may also like...