Vat Purnima Ukhane in Marathi | वटपौर्णिमा विशेष उखाणे

Vat Purnima Ukhane in Marathi:- Best Marathi Ukhane For Vat Purnima, Vat purnima status in Marathi , Vat Purnima Special Ukhane

Vat Purnima Ukhane in Marathi

वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
———–रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात…
———रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ

वटपौर्णिमा म्हणजे, साथ जन्माच्या गाठी,
——-राव भेटूदेत मला, सात जन्मासाठी.

लग्नानंतर वटपौर्णिमेचा, माझा पहिला आहे सण,
——–रावांचे नाव घेते, ठेवून निर्मळ मन.

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती…
——–रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
———–रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.

तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास—–रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
…रावांचं नाव घेते …ची सून

पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
——–रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
——-रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.

कांजीवरम साडी, बनारसी खण,
—-रावांचे नाव घेते, आज आहे—-सण.

वटपौर्णिमा म्हणून, आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे,
———-रावांसाठी प्रार्थना करते, त्यांचे आयुष्य खूप वाढे.

हे पण वाचा

close