Ashadhi Ekadashi Information In Marathi | आषाढी एकादशी माहिती मराठी

Ashadhi Ekadashi Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी महत्व, आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी.

Ashadhi Ekadashi Information In Marathi

आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि पूज्य मानली जाते.

या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात.

पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात, या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे आणि घराघरातील लहान ते मोठया वयातील व्यक्ती या आषाडी एकादशी चा उपवास करतात.

या आषाडी निमित्त महाराष्ट्रसह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जस कि पैठणहून एकनाथांची ची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची ची पालखी, देहूहून तुकारामांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची ची पालखी हि पंढरपुरास येत असते.

शेगाव या ठिकाणावरून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी हि पंढरपुरास रवाना होते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात, स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी या एकादशी स देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हंटले जाते.

हे पण वाचा

close