Akshaya Tritiya Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अक्षयतृतीयेबद्दल ची माहिती मराठी मध्ये, हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया असे म्हणतात.
दसरा गुडीपाडवा, अक्षयतृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडे तीन मुहूर्त मानले जाते. कोणत्याही शुभ कार्य सुरवात करण्यास अक्षयतृतीया दिवशी केला जातो.
या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती , नर नारायण जयंती , परशुराम जयंती , बसवेश्वर जयंती व हयग्रीव जयंती साजरी केली जाते.
मदनरत्न या प्रसिद्ध ग्रंथात भगवान श्री कृष्णांनी या तिथीस दान , हवन तसेच पितरांना उद्देशून कर्म करावे असे सांगितले आहे , अक्षय याचा अर्थ आहे क्षय न होणारे तसेच नाश न पावणारे.
अक्षयतृतीयेला नवीन संकल्प केले जातात, नवीन वाहने खरीदी केले जातात , तसेच नवीन व्यवसायाचा आरंभ इ. होतो.
या दिवशी गोरगरिबांना दान केले जाते , या मुळे पुण्य प्राप्ती होते असे मानले जाते , अक्षयतृतीया मुहूर्तावर नवीन झाडे लावली जातात . स्त्रिया चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे विसर्जन या दिवशी करतात.
अक्षयतृतीया आपल्या तील सहकार्य , नवचेतना बंधुभाव वाढवते तसेच गोरगरीब जनतेबद्दल आपुलकी निर्माण करते , दान केल्याने धन कमी होत नाही उलट त्यात वाढ होते हा मोलाचा संदेश देते
आशा या अक्षय तृतीयेचा शुभ मूर्तावर आपण सर्वानी मनोमन प्रार्थना करूया कि देशातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहूदे , देशावरील कोणतेही सकट दूर करण्याचे बळ मला मिळू दे