बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती | Buddha Purnima Information In Marathi

बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, भगवान बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ , सिद्धार्थ चा जन्म इ.पूर्व ५६३ मध्ये नेपाळ मधील लुंबिनी येथे झाला.

आईची नाव राणी महामाया आणि वडील राजा नरेश सुद्धोधन. सिद्धार्थास राजपुत्राचे वैभवशाली आयुष्य जन्मतः च प्राप्त झल्यामुळे तो सुखात वाढत होता , जन्म दाता मातेच्या जागी त्याचे पालन पोषण त्याच्या मावशीने गौतमी पोटच्या पोरा प्रमाणे केले , नोकर चाकर ,दास दासी , महाल आणि राज सुलभ अश्या सुख वैभवाचा जणू काही कोठ च राजा सुद्धोधन यांनी त्याच्या बोहताली उभा केला होता, त्यांनी सिद्धार्थास चक्रवर्ती राजा बनवण्याचा चंग बांधला होता सोळा वर्ष वय झाल्यावर सिद्धार्थाचा विवाह यशोधरा शी झाला.

यातावकाश तिने एका पुत्रास जन्म दिला त्याचे नाव राहुल , एकेदिवशी सिद्धार्थाने नगरातून फेरफटका मारताना त्याच्या पित्याने त्याच्या पासून दूर राखलेले वास्तव्य पाहिले.

त्याने प्रथमच दारिद्र पाहिले , जीवन शरीराचा रुग्ण पहिला, जयजय वृत्त प्रेत यात्रा पाहिली, तो सुन्न होऊन गेला आपले सुख हा अपवाद आहे आणि जगणं दुःखात बुडालेले आहे हा त्याला साक्षात कार झाला.

त्यानंतर त्यांनी एक संन्यासी पाहिला आणि त्याची जोप उडाली , सुखात मन रमेनासे झाले आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती शेवटी हीच असेल तर कठीण आहे असे त्याचा मानाने घेतले.

त्यातून मुक्त होण्यासाठी सन्यास हा च अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचे त्याग करण्याचे ठरवले २९ व्या वर्षी एका पावसाळी रात्री प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुबुन सिद्धार्थ राजा बाहेर निघाला , सर्व संघ परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह इथे जीवन क्रम सुरु केला.

गृह त्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञान प्राप्तीसाठी खूप चिंतन केले , कठोर तपासर्या केले , पिपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ पूर्व ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्या ज्ञान प्राप्ती झाली या दिव्या ज्ञान ला संबोधी , बुद्धत्व किंवा निर्वाण असेही म्हणतात , ज्ञान प्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतम सर्व जण बुद्ध असे म्हणू लागले.

बुद्धांना ज्या पिपळाचा वृक्षाखाली बुद्धतत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधीवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे हि म्हणतात.

ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे पाच पंडितांना पाहिला उपदेश दिला याच्या पहिल्या उपदेशात धर्म चक्र प्रवर्तन असे म्हणतात , या प्रवचनात बुद्धांनी बोद्ध धर्माची मूळ तत्त्वे सांगितली त्यात त्याना अनेक शिष्य लाभले आणि बोद्ध धर्म वाढीस लागला , भगवान बुद्धांनी पाली या लोक भाषेतून अत्यंत सध्या आणि सोप्या पद्धतीने बोद्ध धर्माची शिकवण आचार विचार सांगितले.

बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण या साठी चार आर्य सत्य अष्टांग मार्ग व पंचशील सांगितले , मनुष्य प्राणी दुःख आणि देण्य व दारिद्र्य राहोत आहोत हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे , म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धमाचा उद्देश आहे , दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धमाचा पाया आहे. असे बुद्धाचे वचन होते.

उत्तर प्रदेश कुशीनगर येथे महत्वाचे जागतिक बोद्धिक तीर्थ स्थळ आहे , येथे गौतम बुद्धांनी त्याच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते.

कुशीनगर , बोधगया, लुबिनी ,सारनाथ हि बोद्ध धर्मातील चार सर्वात पवित्र स्थाने आहे.

इ पूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धाचे महापरिवारण झाले , बुद्धाचे शिकवण आजही या जगात दुःख नाहीसे करण्यासाठी फार उपयोगी पडतात.

मित्रानो माहिती मध्ये काही चुका असल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यात सुधार करू , आमच्या हेतू कोण्हाच्या हि भावना दुखवण्याचा नाही.


You may also like...