Chhath Puja Information Marathi नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत छठ पूजे बद्दल , छठ पूजा हे भारतामध्ये मानवाला जाणारा एक व्रत आहे, या पूजेस विशेष महत्व आहे.
या पूजे मध्ये सूर्यदेवाची उपासना करतात तसेच वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे आणि छठ पूजेच्या वेळी त्या दोहोंची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.
पौराणिक कथेनुसार छठ पूजे ची सुरवात हि रामायणाच्या कालावधीत झाली होती, ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील लोक संक्रातीला सूर्याची उपासना करतात त्याच प्रमाणे उत्तर भारतीय लोक छठ पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना करतात.
छठ पूजा विशेषत: सर्वात जास्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते.
छठ पूजा हि दिवाळी संपल्यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून या पूजेस सुरवात होते. या छठ पूजेला सूर्य षष्ठी पूजा असेही सुद्धा म्हटले जाते.
या वर्षी छठ पूजे ची सुरवात १० नोव्हेंबर या दिवशी पूजा आहे, छठ पूजेचे व्रत फार कठीण असते आणि हे व्रत करणारे भाविक मनोभावाने ३६ तासांचा निर्जला उपास करतात.
छठ पूजेमागील पौराणिक कथा:
असे म्हटले जाते कि छठ पूजेचा सुरवात सूर्यपुत्र कर्णाने केली, सूर्यदेवाची पुत्र कर्ण हा दानशूर होताच, शिवाय तो सूर्यपुत्र असल्यामुळे जन्मत:च त्याला कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी, या करिता कर्ण रोज सकाळी पाण्यात उभा राहून सूर्यदेवाची उपासना करत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असत. महाभारताच्या राजकारणात, द्युतात आपले सर्वकाही गमावल्यानंतर पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे, म्हणून द्रौपदीनेदेखील सूर्याची उपासना केली होती. सूर्य देवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली.
छठ पुजेचे शास्त्रीय कारण:
सूर्याची किरणे प्रखर असतात, त्यात अनेक जीवजंतूचा नायनाट करण्याची क्षमता असते. आणि सकाळची कोवळी सूर्याची किरणे शरीरासाठी पोषक असतात, म्हणून डॉक्टरदेखील डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात चालण्याचा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सर्व प्रकाराच्या रोगराई मधून मुक्तता व्हावी, हीदेखील या पूजेची शास्त्रीय बाजू आपल्याला मानता येईल
सूर्यप्रकाशाचे महत्त्व जाणून आपल्या संस्कृतीने सूर्योपासनेचे आणि सूर्यनमस्काराचे संस्कार घातले आहेत. दिवाळीचा कालावधी थंडीचा. अशात उबदार किरणांनी शरीराला हायसे वाटावे, सर्दी, ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून सुटका व्हावी, यादृष्टीनेही छठ पूजेचे महत्त्व लक्षात घेता येते.
बुधवार १० नोव्हेंबर , २०२१