Debit card information in Marathi | डेबिट कार्ड म्हणजे काय ?

Debit card information in Marathi:- नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपलं आज आपण जाणून घेणार आहोत डेबिट कार्ड म्हणजे काय?

Debit card information in Marathi

मित्रानो जेव्हा आपण बँक मध्ये खाते उघडतो तेव्हा आपल्या हे कार्ड दिले जाते, हे प्लास्टिक चे कार्ड असते ज्याच्या माध्यमातून आपण Transaction करू शकतो.

फक्त आपल्या बँक खात्यावर जितकी रकम असेल तेवढीच आपण खर्च करू शकता, या चा वापर अनेक ठिकाणी होतो

जर आपण एखादी वस्तू खरेदी करता त्या वेळी आपल्याकडे पैसे नसतील तर आपण या कार्ड द्वारे payment करू शकता. जेव्हा आपण या कार्ड द्वारे payment करतात तेव्हा आपल्या बँक खात्यातून पैसे कपात होते.

बँक मध्ये खाते उघडल्यास लगेच किंवा आपल्या त्या करिता फॉर्म भरल्यास हे कार्ड दिले जाते किंवा आपल्या घरी पोस्टाने बँक पाठवते, या डेबिट कार्ड ला आपण ATM कार्ड सुद्धा म्हणतो.

या कार्ड च्या माध्यमातून ATM मशीन मधून पैसे काढण्यास सुद्धा वापर आपण करतो.

डेबिट कार्ड चे फायदे:-

डेबिट कार्ड च्या मदतीने आपण कधी हि आणि कोठेही ATM मशीन द्वारे पैसे काढू शकता किंवा आपण या कार्ड द्वारे वस्तू किंवा ऑनलाईन transaction करू शकता, कुठे हि सहज पैसे काढता आल्या मुळे आपल्या बँकेत मध्ये जाऊन लाईन मध्ये उभा राह्यण्याची गरज पडत नाही,

तसेच या कार्ड चे अनेक फायदे आहे आपण ऑनलाईन विजेचे बिल , मोबाईल चे बिल , हॉटेल चे बिल किंवा एखादी वस्तू खरेदी केल्यास त्याच बिल , पेट्रोल पंप वर पेट्रोल भरणासाठी व इतर अनेक गोष्टी साठी आपण या कार्ड चा उपयोग करू शकता.

डेबिट कार्डचे फायदे तोटे:-

  • जर आपला डिबेट कार्ड चोरीला गेलं किंवा हरवले जर त्यास गोपनीय अंक समजल्यास ते आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.
  • आपल्या बँक खात्या मध्ये असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च आपण करू शकत नाही.
  • डेबिट कार्ड वापरण्याची मर्यादा असते आपण दिवसातून जास्त वेळा डेबिट कार्ड चा वापर केल्यास काही बँकांकडून यासाठीचे अधिक शुल्क खात्यातून कपात केले जाते.

डेबिट कार्ड वापरताना द्यावी लागणारी काळजी:-

ATM मशीन मधून पैसे काढताना बाजूला कोण्ही उभा आहे का आपली माहिती बघण्याचा प्रयन्त करत आहे का

आपली कार्ड चा गोपनीय अंक कोणाला सांगू नका

वारंवार फसवणारे कॉल आपल्या फोन वर येत असतील किंवा आम्ही बँकेतून बोलत आहोत असे म्हणून फसवेगिरी करणाऱ्या पासून सावध रहा , कुठलेही बँक आपल्या फोन करून आपली गोपनीय माहिती विचारत नाही

हे पण वाचा

close