Draupadi Murmu Biography In Marathi | द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती

Draupadi Murmu Biography In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत द्रौपदी मुर्मू याच्या बद्दल याचा (जन्म: २० जून, १९५८) ह्या एक भारतीय महिला राजकारणी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.

2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अधिकृत उमेदवार आहेत.

त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत आणि भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणारी अनुसूचित जमातीची (आदिवासी) पहिली व्यक्ती आहेत.

Draupadi Murmu Biography In Marathi

पूर्ण नाव:द्रौपदी मुर्मू
वडिलांचे नाव:बिरांची नारायण तुडू
व्यवसाय:राजकारणी
पक्ष:भारतीय जनता पार्टी
जन्मतारीख:20 जून 1958
वय:६४ वर्षे
जन्म ठिकाण:मयूरभंज, ओरिसा, भारत

कारकीर्द

त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.

त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले

स्थानिक राजकारण

मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे

द्रौपदी मुर्मू कोण आहे?

NDA द्वारे घोषित भारताच्या पुढील राष्ट्रपतीसाठी उमेदवार.

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?

द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मूच्या पतीचे नाव काय आहे?

श्याम चरण मुर्मू

द्रौपदी मुर्मू कोणत्या समाजाची आहे?

आदिवासी समाज

हे पण वाचा

close