Uddhav Thackeray Biography In Marathi | उद्धव ठाकरे यांचा जीवन परिचय

Uddhav Thackeray Biography In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती.

Uddhav Thackeray Biography In Marathi

उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे 19 वे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत.राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार होते.

नाव (Name):उध्दव बाळासाहेब ठाकरे
जन्म (Birthday):27 जुलै 1960
वडिल (Father Name):बाळासाहेब ठाकरे
आई (Mother Name):मिनाताई ठाकरे
पत्नी (Wife Name):रश्मी ठाकरे
अपत्य (Childrens Name):आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
निवासस्थानमातोश्री, मुंबई
शिक्षण कला शाखेची पदवी, जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई

जन्म आणि सुरुवातीचे जीवन

उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते बाळ ठाकरे आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांचे पुत्र आहेत. उद्वव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून केले. पुढे मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी मिळवली

उद्धव ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

हे पण वाचा

close