Gajanan Maharaj Quotes In Marathi | गजानन महाराज यांचे विचार

Gajanan Maharaj Quotes In Marathi:- (Gajanan Maharaj Status in Marathi) गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते, महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे.

Gajanan Maharaj

Gajanan Maharaj Quotes In Marathi

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
!! जय गजानन माउली !!

करण्या दृष्टांचा अंत ।
शेगावी अवतरले संत ।
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त
सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा..!!

करतो मी स्पष्ट।
नाही मी गर्विष्ठ।।
फक्त झुकतो गजानापुढे।
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ।।

जय गजानन माऊली

माझे चित्त माझे मन।
बोले जय गजानन।।
जीवनातील प्रत्येक क्षण।
गजाननाला अर्पण..!!

संकटातून तारत असे।
विघ्ने दूर सारत असे।।
शेगाविचा गजानन भक्तांवर।
नेहमीच माया करत असे।।
।। जय गजानन माऊली ।।

कणांपासून सृष्टी बनली।
त्यातील मी एक क्षुल्लक कण।।
मात्र प्रत्येक कणात आहे।
माझा गजानन..!!

भक्त मी गजाननाचा।
गुरुवार माझा सण।
गुरुवारी कामे मार्गी लागती।
कठीण असुदे कितीपण।
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।
येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष..!!

अधीर झाले मन
आणखी वाट पहावेना।।
।।गण गण गणात बोते..!!

ध्यानी ध्यास, मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास।
गण गण गणात बोते..!!

Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi | श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा

Mahashivratri Wishes In Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close