Gautam Buddha Quotes in Marathi | भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार

Gautam Buddha Quotes in Marathi:- Motivational Quotes in Marathi, Gautam Buddha Quotes

Gautam Buddha Quotes in Marathi

मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते.

एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय

जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे.

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.

कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते

ज्याने आपल्या मनाला नियंत्रणात केले, त्याच्या विजयाला परमेश्वर देखील अपयशात बदलू शकत नाही.

सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात. जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील.

ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही

एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो; कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो परंतु एक वाईट मित्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला घाव घालतो.

चातुर्याने जगणार्‍या लोकांना मृत्यूलाही घाबरण्याची आवश्यकता नाही.

द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे

द्वेष हा द्वेष केल्याने कमी होत नाही, परंतु प्रेम केल्याने नक्कीच कमी होतो. आणि हेच शाश्वत सत्य आहे.

ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रवास व्यवस्थित करणे आहे.

तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात

तुम्हास आपल्या क्रोधासाठी दंड मिळणार नाही तर तुमचा क्रोधच तुम्हाला दंड देईल.

हजारो शब्दांपेक्षा तो एक शब्द चांगला आहे जो शांती निर्माण करतो.

तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका

भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, भविष्याचा विचार करू नका, आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.

आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा

ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही, त्याच पद्धतीने मनुष्य अध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.

आनंदाचा कोणताही मार्ग नाही, नेहमी आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे.

दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे

अज्ञानी मनुष्य एका बैलाप्रमाने आहे जो ज्ञानाने नव्हे तर फक्त शरीराने वाढतो.

जर आपण अंधकरात बुडलेले आहात तर आपण प्रकाशाचा शोध का नाही घेत?

वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरिता आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विकास करा आणि आपले मन सकारात्मक गोष्टींनी भरा.

रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल

स्वर्गाचा मार्ग आकाशात नव्हे तर आपल्या ह्रदयात आहे.

धबधबा खूप आवाज करतो. समुद्र शांत आणि खोल असतो.

बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे

कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो

स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा

हे सुद्धा वाचा

चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Quotes In Marathi

राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Quotes in Marathi

मदर टेरेसा सुंदर विचार मराठीमध्ये | Mother Teresa Quotes in marathi

हे पण वाचा

close