गुरूनानक जयंती विषयी माहिती | Guru Nanak Jayanti Information In Marathi

नमस्कार मित्रानो आज आपण गुरु नानक जयंती निमित्त गुरु नानक यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया त्याचे जीवन व त्याचे जीवन कार्य.

शिखांचे प्रथम गुरू व शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव. एक महापुरूष आणि महान धर्म प्रवर्तक म्हणुन ते अत्यंत पुजनीय आहेत. समस्त विश्वातील अज्ञानता दुरू करून आध्यात्मिक शक्ति ला आत्मसात करण्याकरता त्यांनी प्रेरीत केले.

gurunanak-jayanti-information-marathi

गुरूनानकजींचा जन्म १४६९ साली पंजाबमधील लाहोर जिल्हयात तलवंडी नावाच्या गावी झाला. आता हे गाव पाकिस्तान मधे असुन “ननकाना साहब” या नावाने ओळखल्या जाते.

गुरुनानक याचे महान कार्य पाहून लोक त्याचे जन्म दिवस प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात.

गुरुनानक याना लहान पानापासूनच अध्यात्मक ची आवड होती, शीख धर्माची सर्वाना ते शिकवण ते देत, तसेच सर्व धर्मीय लोकांना एकत्र आणण्याचा ते सदैव प्रयत्न करीत.

जातिधर्मच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला आपण सर्व मानव आहोत असा मंत्र दिला.

जग बनवणारा एकच ईश्वर आहे, धर्म हे दर्शन आहे , दिखावा नाही हीच धारणा हृदयाशी धरून गुरुनानक काम करीत होते.

एकता श्रद्धा व प्रेमाने त्यांनी जगामध्ये विचाराची क्रांती निर्माण केली.

गुरुनानक याचे प्रमुख दहा सिद्धांत होते
ईश्वर एकच आहे , नेहमी एकच ईश्वराची उपासना करावी , भगवंताचे अस्तित्व सर्वत्र आहे , प्रत्येक प्राणीमात्रात तोच वास करत आहे , सर्व स्त्री पुरुष सामान आहे

प्रामाणिक आणि मेहनतीने पोट भरलं पाहिजे , वाईट काम करण्याचे मनात कधीच आणू नये , नेहमी प्रसन्न राहावे , शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्न गरजेचं आहे, लोभ संग्रह करण्याची सवय वाईट आहे ,
मेहनतीने आणि आणि प्रामाणिक पणे कमावलेल्या वस्तू किंवा पैसा दान म्हणून तुम्ही देऊ शकता.

गुरु नानक याचे हे सिद्धांत जीवनात आले तर नकीच आपले जीवन बदलून जाईल, शिखांचे पहिले गुरु म्हणजे गुरु नानक आणि दहावे गुरु गोविंद सिंग , गुरु गोविंद सिंग यांनी सर्वाना सांगितले माझ्या मृत्यू नंतर गुरु ग्रंथ साहिब याना च गुरु माना ,

शीख या शब्द चा अर्थ शिष्य असा आहे, गुरु नानक जयंतीच्या दिवशी आपण शिष्य बनून सतत चांगले ज्ञान संपादन करत राहिले पाहिजे , कुणाचे शिष्य बना पण सतत ज्ञान घेत राहा , ज्ञान लालसा ठेवा , जिज्ञासा ठेवा

ईश्वर एक आहे हि भावना मनात जागृत करून , सर्व जाती धर्मातील भेदाभेद दूर करायला हवा आणि हे कार्य आपण आज पासून सुरु करा ,
आपण सर्व एका प्रभू ची लेकरं आहोत , असं समजून बंधू भावाच्या नात्याने इतरांशी व्यवहार करायला हवा , या जगामध्ये कोण्ही लहान नाही , कोण्ही हलका नाही , कोण्ही दिन नाही दुबळा नाही , कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बसलेला आहे ,
त्या भगवंताला गुरु मानून या दिवशी शिष्य प्रमाणे ज्ञाचा प्रकाश ग्रहण करण्याचा संकल्प करत गुरु नानक जयंती साजरी करूया.


तर आज आपण एका महान संतांविषयी जाणून घेतले, आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत या लेखाला शेयर करायला विसरू नका. आणि तसेच या लेख मध्ये काही चुका अडल्यास आम्हला संपर्क करा आणि आपल्या जवळ अजून माहिती असेल तर आम्हला पाठवा आम्ही त्यात सुधार करू.


You may also like...