Hanuman Jayanti Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंती विषयी, महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला असता , यज्ञातून अग्निदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यासाठी पायस प्रधान केले होते.
दशरथाच्या राण्याप्रमाणेच तापशर्या करणाऱ्या अंजलीलाही खीर, यज्ञातील अवशिष्ठ प्रसाद मिळाले होते व त्यामुळेच मारोतीचे जन्म झाला होता.
त्यादिवशी चैत्र पौर्णिमा होती , तो दिवस म्हणजे हनुमान जयंती म्हणून साजरी करतात, वाल्मिकी रामायणामध्ये अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला, जन्म झाल्यावर उगवणारे सूर्यबिब हे एखादे फळासारखे असावे या समजुतीने हनुमानाने आकाशात उडान करून त्याकडे झेप घेतली, त्यादिवशी पर्व तिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता.
सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहूच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले ते हनुवटीला लागून ती छाटली गेली , त्यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
त्या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरवात करतात, सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वाना प्रसाद म्हणून सुठवाडा देतात.
हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त करतात, हनुमान जयंती या तिथी ला मारुतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.
या दिवशी श्री हनुमंते नमः। हा नामजाप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतितत्त्वाचे आपल्याला लाभ मिळते, जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उडान केले अशी हि कथा आहे, तिथून वायुपुत्र (वायुतत्वातून निर्माण झालेला ) मारुती हा सूर्याला जिकणारा होता , हे लक्षात आले.
पृथ्वी, आप , तेज , वायू ,व आकाश या तत्वात वायुतत्व हे तेजतत्वापेक्षा जास्त सूक्ष्म , म्हणजे जास्त शक्तिमान आहे.