Hartalika Teej Information In Marathi | हरतालिका तीज व्रताविषयी माहिती

Hartalika Teej Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका तीज व्रताविषयी माहिती.

चथुर्तीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात, या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात , हरतालिका या शब्दाची फोड “हरित ” म्हणजे हरण करणे आणि “आलिका ” म्हणजे आलीच्या मैत्रिणीच्या असा आहे
मैत्रिणीच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे.

Hartalika Teej Information In Marathi

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे.

हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला किंवा आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात, तसेच सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात.

हरितालिका विषयी पौराणिक कथा

पूर्वकाली पर्वतराजाची मुलगी पार्वती ही ज्यावेळी लग्ना योग्य झाली त्यावेळी तिच्याकरता वर पाहाणे सुरू झाले नारदमुनींनी पर्वतराजाला पार्वतीकरीता भगवान विष्णुंचे स्थळ सुचवले. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.

त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.

पूजाविधी

वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे

संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते

दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते ग्रहण करतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.


टीप:- मित्रानो आम्ही दिलेल्या लेख मध्ये काही चुका अडल्यास आम्हला आम्हला ई-मेल द्वारे पाठवावे आम्ही त्यात लगेच सुधार करू धन्यवाद

हे पण वाचा

close