International Yoga Day Information In Marathi | जागतिक योग दिन माहिती

International Yoga Day Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत योग दिन बद्दल , संपूर्ण जगामध्ये 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.

International Yoga Day Information In Marathi

सप्टेंबर २०१४ मध्ये भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. वेगवेगळ्या योग विशेषज्ञ आणि इतर जगातील नेत्यांनी ते स्वीकारले. संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व

योगाची कल्पना हि पुरातन काळापासून झाली होती. योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते , २१ जून हा योग दिन निवडण्याचे कारण म्हणजे हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस असतो.

योगाचे काही महत्त्वपूर्ण फायदे

  1. नियमित योगा केल्यास , ताणतणावापासून तुम्हला मुक्ती मिळू शकते.
  2. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम करत असाल तर तुम्हला पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा मिळते आणि तुमच्यात उत्साह कायम राहतो.
  3. योगा केल्यामुळे शरीरातील साखरेवर नियंत्रण राहते.
  4. योगा केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.
  5. योगा मध्ये अशी अनेक आसने आहेत ज्यामुळे तुमची पचन क्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
  6. योगा केल्यामुळे शरीरातील रक्त भिसरण वेगाने होण्यास मदत मिळते
  7. तुम्ही सुरवातीपासून जर योगा करत असाल तर तुम्हला म्हतारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरे जावे लागते.
  8. नियमित योगा केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  9. महिलांच्या सोंदर्य वाढवण्याकरिता योग फायदेशीर आहे.
  10. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित योगा करावा.
  11. तणावमुक्त , आनंदी समाधानी जीवनासाठी नियमित योगा करावा.
  12. योगा केल्याने शरीर लवचिक होते आणि शरीराची ठेवणं सुधारते

निरोगी आयुष्याची गुरु किल्ली म्हणजेच योग म्हणून नियमित योगा करा.

हे पण वाचा

close