Kojagiri Purnima Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा बद्दल, तस तर कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर रात्री गच्ची वर जाऊन मोज मजा करीत मसाला दूध आटून त्यात चंद्र पाहून ते आनंदाने पिणे हि आपली सर्वांची च कोजागिरी बद्दल कल्पना.
मात्र मित्रानो कोजागिरी साजरी करण्यामागे कारणे, शास्त्र , परंपरा व त्याचे महत्व इत्यादी बाबत आपल्याला कवचितच माहित असते.
चला तर मग आपल्या महान भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा पैकी एक असलेल्या कोजागिरी पोर्णिमेबद्दल आज आपण जाणून घेऊया.
चार महिन्याचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, हि पौर्णिमा शरद ऋतू त येते , म्हणून तिला कोण्ही शरद पौर्णिमा तर अश्विन महिन्यात येते तर म्हणून तिला शास्त्र समद भाषेत अश्विन पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.
कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्व आहे, इंग्रजी महिन्या प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा हि बहुदा ऑक्टोबर महिन्यात असते, कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठया उत्सहाने साजरा करतात, हि पौर्णिमा पावसानंतर ची पहिली पौर्णिमा असते.
पावसात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुदर दिसते त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हुणुन हा सण साजरा करतात.
अश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरंत्र होते अश्या वेळी इष्ट मित्र सह चांदण्या रात्र ची मोज अनुभवता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.
मजेदार गोष्ट म्हणजे कोजागिरी च्या रात्री लोकांना चांदण्याचा आनंद मिळावा म्हणून अनेक शहरातील महानगर पालिका रस्त्यावरचे दिवे लावत नाही या दिवशी पोहे व साले पाणी प्रसाद म्हणून वापरतात, शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून अराम करीत असतो.
या दिवशी रात्री दूध गरम करून त्यामध्ये चंद्र ला पाहतात चंद्र हि त्यादिवशी ९९ टके पूर्ण दिसतो , त्यामुळे या रात्री वातावरण अगदी छान असते , आकाश खुले असते, त्यामुळे या पौर्णिमेच्या चंद्राला हार्वेस्ट मून असेही म्हटले जाते ,
कोजागिरीला लक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर उतरून को जागृती करते, को जागृती याचा अर्थ कोण्ही जागे आहे का? असा होय त्यामुळेच त्या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात.
असं मानतात जे या रात्री जागे असतात त्यांना लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो , मात्र याचा अर्थ रात्रभर जागी राहणे असा होत नाही , संपूर्ण रात्र जागरण करणें बंधन कारक नसून श्रद्धावान पाहते ३ वाजे पर्यंत जागरण करू शकतात.
या रात्री मसाला दूध तयार करतात आणि या दुधात चंद्राचे चांदणे पडले कि ते दूध प्राशन करतात , मसाला दूध पिण्याचे शास्त्रीय कारणे आहेत
शरद ऋतू मध्ये मसाला दूध आरोग्यास चांगले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे.
त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे , कोजागिरीला उत्तररात्री पर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटूंबातील जेष्ठ दांपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात.
आता आपण कोजागिरी च्या दिवशी करणाऱ्या व्रत बदल माहिती घेऊया
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व म्हशीवर बसलेल्या बळी राजा ची पूजा करतात या रात्री मंदिरे ,उद्याने , घरे ,रस्ते इत्यादी ठिकाणी दिवे लावतात.
या रात्री जितके दिवे लावावे तितके कल्प मानवाला सूर्य लोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते , लक्ष्मी व बळीराजाची पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी , देव पितरांना समर्पून व आप्तेष्टाना देऊन स्वतः सेवन करतात , चंद्राला आटीव दुधाचा नैवेध दाखवतात, आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजा आणि बळीराजाची पूजा करून सर्वाना भोजन घालून प्रार्थना करतात.
या पूर्वी सांगितल्या प्रमाणे अशी आख्यायिका आहे कि उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को जागृती करते , म्हणजे च कोण जागत आहे.
भ्रमपुराणानुसार कोजागिरीला रस्ते झाडावे घरे सुशोबित करावीत , दिवसा उपवास करावा आपल्या दारासमोर दिवा लावून पूजा करावी चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नवेध दाखवा. ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गायी ची पूजा करावी.
अश्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात