KYC Information in Marathi | KYC म्हणजे काय?

KYC Information in Marathi:- नमस्कार मित्रानो स्वागत आहे मराठी ब्लॉग्स मध्ये आज आपण आज जाणून घेणार आहोत KYC म्हणजे काय? KYC हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, हा शब्द बँक च्या क्षेत्रातील संबंधित आहे.

बँक खाते उघडायचे असेल किंवा बँक ला मोबाईल नंबर लिंक करायचे असेल , त्यासाठी आपण KYC फॉर्म भरा असे बँकेत बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल.

आपण KYC शब्द जरी नेहमी ऐकला असेल तरी पण आपल्या बऱ्याचदा KYC म्हणजे काय आहे हेच माहित नसते.

तर चला जाणून घेऊया आपण KYC म्हणजे काय आणि त्याचा फुल्ल फॉर्म ,तसेच KYC कशाकरिता करायची, आणि त्यासाठी लागणारी कागद पत्रे.

KYC Information in Marathi

Phone Pay , PayTM ,Google Pay या सारखे पैशाची देवाण घेवाण करणारे अँप वापरण्याकरिता आपल्या प्रथमतः KYC करावी लागते.

KYC चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

KYC चा फुल्ल फॉर्म Know Your Customer:- म्हणजे मराठी मध्ये आपला ग्राहक जाणून घ्या

KYC हि अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे समजू शकते तो आपली ओळख साठी दिलेली माहिती खरी आहे कि नाही , ज्यामुळे व्यवहारात ग्राहकडून होणारी फसवे गिरी थांबवता येते

जेव्हा बँक चा व्यवहार करताना बँक ग्राहकाकडून ओळखची खात्री करून घेण्याकरिता कागद पत्रे मागते तर त्या कागदपत्रांना KYC Documents असे म्हटले जाते.

तसेच बँक क्षेत्र सोडून विमा कंपनी किंवा आपल्या फोनसाठी सिम कार्ड घेतानी, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करण्यासाठी, आपणाला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी ओळखपत्र मागितले जाते. तेव्हा ओळखपत्र म्हणून आपल्या आधार कार्डची पडताळणी केली जाते, या प्रक्रियेला देखील केवायसी KYC असे म्हंटले जाते

KYC करण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रे गरजेची असतात ती खालीलप्रमाणे आहेत. ज्या द्वारे आपण KYC करू शकता

आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान ओळखपत्र
वाहन परवाना
पासपोर्ट

हे पण वाचा

close