Mahaparinirvan Diwas Mahiti In Marathi | महापरिनिर्वाण दिन माहिती

Mahaparinirvan Diwas Mahiti In Marathi:- नमस्कार मित्रानो आपली राज्यघटना घडवण्यात डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, यामुळेच बाबासाहेब यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून असे ओळखले जाते. बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक व तसेच भारताचे पहिले कायदा मंत्री सुद्धा होते

Mahaparinirvan Diwas Mahiti In Marathi

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. डॉ भीमराव रामजी आंबेडकर याचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली त्यांच्या घरी महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. व दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर या रोजी मुंबई मध्ये चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.

चैत्यभूमी म्हणजे बाबासाहेब यांच्या समाधीचे ठिकाण, इथेच बाबासाहेबांचे अंतिम संस्कार झाले होते. या दिवशी भारतभरातून लाखो लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमी ला भेट देतात. व याची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. हे स्थान मुंबई मध्ये दादर याठिकाणी, समुद्रकिनारी आहे.

निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बाबासाहेबाना बौद्ध लोक ‘बोधिसत्व’ मानतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण म्हणजे काय?

बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ “परिणीबाना” असे लिहिले गेले आहे, याचा शब्दशः अर्थ ” मोक्ष” असा होतो. ” बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.


मित्रानो माहिती आवडल्यास नक्की Share करा, आपल्या जवळ अजून माहिती असल्यास आम्हला पाठवा आणि यात काही चुका अडल्यास आम्हला सम्पर्क करा आम्ही यात सुधार करू धन्यवाद.

हे पण वाचा

close