Mahatma Gandhi Nibandh Marathi | महात्मा गांधी निबंध मराठी

Mahatma Gandhi Nibandh Marathi:- नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या विषयी अप्रतिम मराठी निबंध.

mahatma-gandhi-marathi-nibandh

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती Mahatma Gandhi information in Marathi

नाव (Name)मोहनदास करमचंद गांधी
जन्म (Birthday) २ ऑक्टोबर १८६९
जन्मस्थान (Birthplace) पोरबंदर, गुजरात
वडील (Father Name) करमचंद उत्तमचंद गांधी
आई (Mother Name) पुतळाबाई करमचंद गांधी
पत्नी (Wife Name) कस्तुरबा
मुले (Children’s Name)हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास.
भावंडे (Brother & Sister)लक्ष्मीदास, करसनदास आणि बहिण तेथेपोरबंदर, गुजरात
मृत्यूस्थान (Death Place)नवी दिल्ली, भारत
मृत्यु (Death) ३० जानेवारी १९४८

Mahatma Gandhi Nibandh Marathi

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणजे महात्मा गांधी,

महात्मा गांधीजी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या रोजी गुजरात मधील पोरबंदर येते झाला, त्याचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. महात्मा गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आई चे नाव पुतळाबाई हे होते.

वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा याच्याशी झाला. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर , माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.

महात्मा गांधीजी, भारत मातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वांत्र्याचे शिल्पकार तसेच संपूर्ण जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे हे युग पुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अश्या पदापर्यंत पोहचले.

महात्मा गांधी ये मॅट्रिक चे परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंड ला गेंले आणि तिथे त्यांनी खूप अभ्यास करून बॅरिस्टर हे पदवी पूर्ण केली, आणि त्यानंतर भारत मातेची सेवा करण्यासाठी ते आपल्या मायदेशी परतले,

एकदा एका खटल्या साठी दक्षिण आफ्रिकेत गेले, तेव्हा तिथे असंख्य भारतीय मजूर हजर होते, व त्यांना इंग्रज लोक अपमानास्पद वागणूक देत होते, तीच वागणूक जी आहे गांधीजी ना हि दिली, तेव्हा त्यांनी अन्याविरुद्ध लढण्याचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसेचा चातुर्याने वापर केला साधी राहणीमान आणि उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजी यांनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले.

खेडे गावाचा विकास, सूतकताई, स्वदेशी, दलितांचा उद्धार, स्वछता, स्वालंबी पण या कडे त्यांनी अधिक लक्ष दिले, सत्याग्रह , निशस्त्र प्रतिकार आणि तसेच असहकार आंदोलनांचा स्वीकार करून, गांधीजी यांनी भारतीय जनतेचे ऐक्य बाळ वाढविले, इंग्रज समोर आव्हान निर्माण केले.

गांधीजी यांना अनेक वेळा तुरंगवास भोगावा लागला , महात्मा गांधीजी यांनी हार नाही मानली, त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला , चले जावं , भारत छोडो , अशे घोषणा देत त्यांनी इंग्रजांना त्यांनी सळो कि पळो करून सोडले होते. पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसे पुढे मान जुकवून हार पत्करली.

सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधीजींचा विजय झाला व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हा देश स्वतंत्र झाला, गांधीजी चे स्वतंत्र भारत देश हे स्वप्न पूर्ण झाले. पण दुर्देवाने ३० जानेवारी १९४८ या रोजी गांधीजी याची एका असंतुष्टाने या थोर महात्म्याची हत्या केली, गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्याचे कार्य आणि विचार प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील.


FAQ’s

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे?

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते?

गोखले यांस गांधींनी आपले राजकीय गुरू म्हणून अत्यंत पूज्य मानले.

गांधीजींना महात्मा हि उपाधी कोणी दिली?

रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना ‘महात्मा ‘ हि उपाधी दिली

हे पण वाचा

close