Onam Festival Information Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत ओणम या सणाबद्दल , दक्षिण भारतामधील केरळ येथे ओणम या सणाला फार महत्व आहे, जसे महाराष्ट्रामध्ये गणेशउत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, त्याच प्रमाणे ओणम आहे सण केरळ मध्ये दहा दिवस साजरा केला जातो
ओणम हा सण आश्विन महिन्यात येतो ओणमच्या पहिल्या दिवसाला ‘अथम’ आणि शेवटच्या दिवसाला ‘थिरुओणम’ असे म्हटले जाते. या दिवशी केरळ मधील लोक नवीन कपड्यांची खरेदी करतात व या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात तसेच केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक ओणम हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.
ओणम या सणाची परंपरा ही फार जुन्या काळापासून चालत आली आहे. या दिवशी केरळ मधील लोक केळीच्या पानात जेवण वाढले जाते. तसेच लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद द्विगुणीत करतात ओणम सणाच्या दिवशी नावस्पर्धा, नृत्य, संगीतस, महाभोज यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते.
ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. बळीराजाच्या आगमनानिमित्त व त्याच्या स्वागतासाठी ओनमचा सण साजरा करण्यात येतो
या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. पावसाळा सरत आल्यावर निसर्गात सगळीकडे हिरवाईचा बहर असतो.
असे म्हटले जाते की राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर अवरतो , राजाला खुश करण्यासाठी आंबट-गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवून त्यानंतर सर्वजण भोजन करतात.
केरळ वासियांसाठी ओणम हा महत्वपूर्ण पर्व असून या दिवशी उत्सव अगदी जलोषाने साजरा करताना दिसून येते. या दिवशी मंदिरात आणि घरात पारंपारिक मान्यतानुसार पूजापाठ केली जाते. हा सण साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक मान्यता सुद्धा आहे. राजा महाबली याच्या आदरार्थासाठी ओणम हा सण साजरा केला जातो.