Raksha Bandhan Nibhand In Marathi | रक्षाबंधन मराठी निबंध

Raksha Bandhan Nibhand In Marathi:- (Essay On Raksha Bandhan In Marathi) रक्षाबंधन हा हिंदू उत्सवापैकी एक महत्वाचा सण ,रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण मनाला जातो ,रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही संबोधले जाते.

Raksha Bandhan Wishes In Marathi

Raksha Bandhan Nibhand In Marathi

रक्षाबंधांचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो, समाजामध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो

रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचे ओक्षण करते ,

भाऊ बाह्य शत्रूपासून व अंतविकारापासून सुरक्षित राहो आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना बहीण या दिवशी करते
समाजात बहीण ताठ मानेने वागावी आणि तिच्या संरक्षणाची जबादारी भाऊ घेतो.

राखीचा धागा हा नुसता सुताचा दोरा नसून ते एक शील , स्नेह सतत, संयमी ठेवणारे बंधन आहे.

या दिवशी घरोघरी गोड नारळी भात करण्याची प्रथा आहे.


रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन , भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे , भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात , रक्षाबंधन हा हिंदू उत्सवापैकी एक सण आहे हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण आहे.

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो, जो मुख्यतः इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे आगस्ट महिन्यात येतो , हा सण म्हणजे पराक्रम प्रेम, साहस याचा संयोग आहे ,

जगातील नात्यामध्ये भाऊ बहिणेचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र मानले जाते, रक्षाबंधांच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते , राखी बांधण्यापूर्वी ती भावाला कपाळाला टिळा लावते , म्हणजेच सामान्य दृष्टितीने जगाकडे पाहणाऱ्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र दृष्टी ती आपल्या भावाला देते. या संकेत या क्रियेतून दिसून येतो.

नंतर बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते , बाह्य शत्रूपासून आणि अंतविकारापासून आपला भाऊ सुरक्षित राहो आणि आयुष्यात विजय प्राप्त करो , त्याला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करते.

समाजात आपली बहीण ताठ मानेने वागावी आणि तिच्या संरक्षणाची जबादारी भाऊ घेतो , समाजामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत हा सण साजरा होतो , राखीचा हा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील , स्नेह सतत संयमी ठेवणारे बंधन आहे.

या धाग्याने कित्येक मने जुळून येतात , मने प्रफुल्लीत होतात ,गरीब बहिणीने भावाला बांधलेला धागा काय , श्रीमंत बहिणीने भावला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आजच्या तंत्र च्या युगामध्ये इंटर्नेटच्या माध्यमातून पाठवलेली राखी काय , या सर्वामागची एक च भावना असते ती म्हणजे भाऊ बहिणेचे प्रेम.

या दिवशी घरोघरी गोड बेत असतो या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात , त्यामुळे या दिवशी गोड नारळी भात करण्याची प्रथा आहे.

अश्या प्रकारे हा सण फक्त भाऊ बहिणीचा च नसून संपूर्ण कुटूंबाचा आहे , आजच्या वाढत्या तंत्र ज्ञाच्या युगात या सणाला विशेष महत्व आहे.

हे पण वाचा

close