Republic Day Information In Marathi | प्रजासत्ताक दिन’!

Republic Day Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिन बद्दल, आणि आज आपण जाणून घेणार आहोत कि २६ जानेवारी का साजरा केला जातो

Republic Day Information In Marathi

मित्रानो २६ जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, मित्रानो भरपूर जणांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधील फरक माहित नाही.

हजारो स्वत्रंत्र सेनानी , देशभक्त , क्रांतिवीर या आपल्या भारत देशासाठी शहीद झाले, त्याचे एकच स्वप्न कि भारताची पुढची पिढी स्वत्रंत्र देशात जन्माला यावी.

मित्रानो तुम्हाला सर्वाना माहित आहे कि आपल्या देशावर कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले, आणि आपला देश स्वतंत्र होवा म्हणून , हजारो जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

त्यावेळेस त्यांनी ब्रिटिशांचे कायदे आपल्या देशामध्ये लादले, आणि त्याच्या कायदाच जो कोण्ही विरोध करेल त्याच्यावर ते अत्याचार करत.

१३ एप्रिल १९१९ साली हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली, तेव्हा भगत सिंह, उधम सिंह , सुखदेव, राजगुरु आणि अशे अनेक क्रातींकारी निर्माण झाले.

कारण हि घटना एवढी वाईट होती कि Reginald Dyer च्या नेतृत्वाखाली ब्रिटीशानी लहान मुले , वृद्ध स्त्रिया ,अश्या हजरो लोकांना चे प्राण घेतले. या घटने नंतर सगळ्या भारतीय च्या हृद्य मध्ये स्वतंत्र ची आग पेटू लागली होती. प्रत्येक जण भारताच्या स्वंतत्र साठी बलिदान द्यायला तयार होता.

नंतर २६ जानेवारी १९३० मध्ये पंडित जवाहर लाल नेहरू याच्या अध्येक्ष ते खाली काँग्रेस ने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराजाची मागणी केली. आणि त्यावेळेस त्यांनी लाहोर मध्ये रावी नदी च्या किनारी तिरंगा फडकवला.

हा दिवस संपूर्ण भारतात, स्वतंत्र दीना सारखा साजरा करण्यात आला , या नंतर ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध या मुले भारताला स्वतंत्र साठी जास्त काळ लढा द्यावा लागला.

आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले, भारत स्वतंत्र जरी झाला होता , तरी भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते.

मित्रानो एक छोटी संस्था जरी चालवायची झाली तरी त्या संस्थेसाठी नियम बनवावे लागतात , मग आपला भारत देश हा एवढा मोठा ज्याच्या मध्ये वेगवेगळे राज्य आहे ते चालवण्यासाठी आपल्या काही नियम बनवावे लागणार होते.

म्हणून हे संविधान , हे बनवण्यासाठी २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या अध्येक्षते खाली समितीची संथपणा करण्यात आली.

४ नोव्हेंबर १९४७ रोजी समितीने विधान सभेमध्ये आपला पहिला मसुदा सादर केला , विधान सभेत २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसात अनेक सत्रवर या संविधानावर चर्चा आणि सुधार होत राहिला , हे सत्र जनतेसाठी खुले होते , स्वातंत्राच्या मागणी सोभतच , स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटीशानी मान्य केली.

आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले, पण ते अमलात कधी पासून आणायचे या वर नेतेचे चर्चा झाली. आणि त्याच्या मनात २६ जानेवारी हि तारीख आली ,कारण पंडित जवाहर लाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर मध्ये रावी नदी च्या किनारी तिरंगा फडकवला होता आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

२४ जानेवारी १९५० रोजी विधान सभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तहलेखि काढल्या, त्यापैकी एक हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये. दोन दिवसांनी २६ जानेवारी १९५० रोजी, संविधानाची अंबलबजावणी झाली.

आणि भारत गणराज्य बनले, आणि संविधान आम्लात आणले गेले म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो.


मित्रानो आपल्याला माहिती आवडल्यास आपण share करू शकता आणि या मध्ये काही चुका अडल्यास आम्हला संपर्क करा आम्ही लगेच यात सुधार करू धन्यवाद

You may also like...

close